शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

३० वर्षांपासून गोवरीवासीयांचा संघर्ष कायम

By admin | Updated: April 6, 2016 00:44 IST

गावाच्या सभोवताल कोळसा खाणींचे जाळे पसरले. कोळसा उत्खननासाठी जमिनी अधीग्रहन झाल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी कोळसा खाणींसाठी जमिनी दिल्या.

वेकोलिच्या दुष्परिणामांचा मनस्ताप : उपाययोजना करण्यासाठी चालढकलप्रकाश काळे गोवरीगावाच्या सभोवताल कोळसा खाणींचे जाळे पसरले. कोळसा उत्खननासाठी जमिनी अधीग्रहन झाल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी कोळसा खाणींसाठी जमिनी दिल्या. परिणामी जमिनीचा कोरभर तुकडाही आता शिल्लक नाही. कोळसा खाण परिसरात डेंजरझोन मध्ये येणारी गावे वेकोलिने दत्तक घेतली. त्यामुळे वेकोलिने गावकऱ्यांना सोयी सुविधा पुरविने आवश्यक होते. मात्र वेकोलिने केवळ दुष्परीणामच गावकऱ्यांच्या माथी मारल्याने गोवरीवासीयांचा संघर्ष गेल्या ३० वर्षापासून आजही कायम आहे.राजुरा तालुक्यापासून अवघ्या १० किमी अंतरावर असलेले व वेकोलिच्या कुशीत वसलेले गोवरी हे चार हजार लोकसंख्येचे गाव. गावाच्या सभोवताल वेकोलिच्या कोळसा खाणींचे जाळे आहे. अगदी गावालगत असलेल्या कोळसा खाणींमुळे गावकऱ्यांना वेकोलिचे दुष्परिणाम सहन करावे लागत आहे. वेकोलितील शक्तिशाली ब्लॉस्टिंगने येथील नागरिकांचे आयुष्यच हादरले आहे. मात्र कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात वेकोलि प्रशासन हयगत करीत आहे. गोवरी गाव हे वेकोलिच्या डेंजरझोन परिसरात येते. कोळसा खाण परिसरातील गावांचा विकास व्हावा, यासाठी वेकोलिने परिसरातील गावांना दत्तक घेतले आहे. वर्षभरात गावकऱ्याच्या भल्यासाठी वेकोलिने विविध योजना राबविणे आवश्यक आहे. मात्र थातूरमातूर विकासकामे करुन गावाची विकासाकडे वाटचाल होणार कशी, हे वेकोलि प्रशासनाला सांगणार कोण?वेकोलिने मातीचे महाकाय ढिगारे गोवरीगावालगत असलेल्या नाल्याच्या किणाऱ्यावर टाकले आहे. पावसाळ्यात या गावाला बँकवॉटरचा फटका बसतो. मातीच्या ढिगाऱ्याला पाणी अडून गोवरी गावात पाणी फेकले जाते. क्षणार्थात संसार पाण्यावर तरंगायला लागतो. हे सारे वेकोलिचे दुष्परीणाम आहे. मात्र गावकऱ्यांच्या समस्या जाणून घ्यायला वेकोलिच्या जबाबदार अधिकाऱ्यांकडे वेळ नाही. वेकोलिने वर्षाकाठी करोडो रुपयाचा नफा कमवायचा आणि वेकोलिने दुष्परिणाम गावकऱ्यांच्या माथी मारायचे, असा ३० वर्षापासून चालत आलेला अलिखित नियम आजही कायम आहे. मात्र वेकोलिने घालून दिलेला नियम तोडण्यासाठी कोणत्याही लोकप्रतिनिधीने साधा प्रयत्नसुद्धा केलेला नाही. कोळसा खाण परिसरातील गोवरी हे लोकसंख्येने मोठे गाव आहे. मात्र या गावाची समस्याही आता लहान राहिली नाही, असे गावकऱ्यांनी सांगितले.