शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
2
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
3
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
4
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
5
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
6
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
7
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
8
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
9
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
10
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
11
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
12
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
13
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
14
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
15
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
16
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
17
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
18
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
19
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
20
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्यानंतर धावली लालपरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 05:01 IST

एसटी महामंडळाचे बस म्हणजे सर्वसामान्यांची जिवाभावाची लालपरी. दळणवळणाचे सर्वात मोठे साधन म्हणून बसकडे पाहिले जाते. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात ही बस पोहचते. मात्र लॉकडाऊनमुळे या लालपरीचे चाकं मागील दोन महिन्यांपासून थांबले होते. मात्र आता राज्य शासनाने नान रेड झोनमध्ये लॉकडाऊन शिथील केल्यामुळे जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरू करण्यात आल्या आणि दोन महिन्यानंतर जिल्ह्यातील रस्त्यांवरून लालपरी धावताना दिसली.

ठळक मुद्देचारही आगारांमधून जिल्हांतर्गत फेऱ्या : पहिल्या दिवशी ५१८ प्रवाशांचा प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे २२ मार्च ते २१ मे या कालावधीत एसटी बस आगारातच होती. आता लॉकडाऊनच्या अटी शिथील करण्यात आल्याने तब्बल दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर २२ मे रोजी लालपरी प्रवाशांना घेवून रस्त्यावर धावताना दिसून आली.एसटी महामंडळाचे बस म्हणजे सर्वसामान्यांची जिवाभावाची लालपरी. दळणवळणाचे सर्वात मोठे साधन म्हणून बसकडे पाहिले जाते. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात ही बस पोहचते. मात्र लॉकडाऊनमुळे या लालपरीचे चाकं मागील दोन महिन्यांपासून थांबले होते. मात्र आता राज्य शासनाने नान रेड झोनमध्ये लॉकडाऊन शिथील केल्यामुळे जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरू करण्यात आल्या आणि दोन महिन्यानंतर जिल्ह्यातील रस्त्यांवरून लालपरी धावताना दिसली.बºयाच दिवसानंतर गावखेड्यात जिवाभावाची बस धावताना दिसल्यामुळे अनेकांच्या चेहºयावर समाधान दिसून आले.बसमध्ये केवळ दोन-तीनच प्रवासीचंद्रपूर आगारातून सकाळी ६ वाजता बस सोडण्यात आली. पहिल्या दिवशी जिल्ह्यातील सर्व आगारांमध्ये अल्प प्रतिसाद मिळाला. एका गाडीमध्ये क्षमतेच्या ५० टक्के प्रवासी बसविण्याची परवानगी देण्यात आली असली तरी केवळ दोन किंवा तीन प्रवाशांनीच प्रवास केला. काही ठिकाणी तर प्रवासीच नसल्याने अनेक बस रिकाम्याच सोडण्यात आल्या. कोरोना विषाणू संसर्गाच्या भितीने नागरिकांनी एसटी बसने प्रवास टाळल्याचे चित्र पहिल्या दिवशी दिसून आले.मास्क लावूनच बसमध्ये प्रवेशसर्वसामान्यांना प्रवास करणे सोयीचे व्हावे, यादृष्टीने शासनाने काही अटी, शर्थी ठेवत जिल्ह्यातंर्गत बससेवा सुरू करण्यास मुभा दिली आहे. यानुसार जिल्ह्यात २२ मेपासून चारही आगारांमधून ठरलेल्या नियोजनानुसार बस सोडण्यात आल्या. सुरुवातीला बसस्थानक व बसचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. प्रवाश्यांना सॅनिटायझरचा वापर करण्यासह मास्क लावूनच बसमध्ये प्रवेश देण्यात आला.पहिल्या दिवशी १३३ बसफेऱ्याचंद्रपूर विभागातील चंद्रपूर, राजुरा, वरोरा व चिमूर आगारातून १३३ बस फेºया चालवण्यात आल्या. यामध्ये १२ हजार ७७२ किलोमीटर लालपरी धावली. शुक्रवारी एकूण १३३ फेऱ्यांमधून ५१८ प्रवाशांनी प्रवास केला. यासाठी चारही आगारांमधून जिल्ह्यातंर्गत बसफेºया सोडण्यात आल्या. यासाठी ७२ चालक, वाहक यांना कर्तव्यावर रुजू करण्यात आले. पहिल्या दिवशी प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याची माहिती विभागीय वाहतूक नियंत्रकांनी दिली.जिल्ह्यांतर्गत शुक्रवारी नागरिकांना बससेवेचा लाभ देण्यात आला. शासनाच्या मार्गदर्शन सूचनांचे पालन करण्यात आले. मास्कशिवाय कोणत्याही प्रवाशाला बसमध्ये प्रवेश दिला नाही. पहिल्या दिवशी प्रवाश्यांकडून अल्प प्रतिसाद मिळाला.-आर.एन. पाटील, विभागीय नियंत्रक,राज्य परिवहन महामंडळ, चंद्रपूर.

टॅग्स :state transportएसटी