घुग्घुस नजीकच्या नकोडा गावातील फुकटनगरमधील शिब्बू शर्मा व दीपक शर्मा या दोन भावात २० जुलै २०१८ ला सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान क्षुल्लक कारणावरून वाद झाला. त्या दरम्यान रागाच्या भरात लहान भाऊ दीपक शर्माने शिब्बू शर्मा या मोठ्या भावावर कुऱ्हाडीने वार केले. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती तत्कालीन ठाणेदार पोलीस निरीक्षक सत्यजित आमले यांनी आपल्या पोलीस कर्मचाऱ्यासह घटनास्थळ गाठले. आरोपीविरुद्ध ३०२ अन्वये गुन्हा नोंदवून हत्या प्रकरणाचा तपास करीत सूत्रे फिरवून घुग्घुस गुन्हे शाखेचे सचिन अल्लेवार व सचिन बोरकर यांनी आरोपीला अटक केली होती.
ठाणेदार आमले यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषारोपपत्र न्यायालयात पाठविले होते. न्यायालयाने साक्षीपुरावे तपासून आरोपी दीपक शर्मा याला सात वर्षे सक्तमजुरीची व पाच हजार दंड, दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठाविली.