घरात तलवार ठेवली; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
By परिमल डोहणे | Updated: September 16, 2023 21:54 IST2023-09-16T21:53:36+5:302023-09-16T21:54:01+5:30
तान्हा पोळ्याच्या दिवशी छत्रपती नगर वाॅर्डात भूषण मोतिलाल उसरेटी (वय ४३) रा. छत्रपती नगर वाॅर्ड बियाणी नगर याला अटक करून त्याच्यावर कलम ४२५ अन्वये गुन्हा दाखल करून पाच हजार रुपये किमतीची तलवार जप्त केली आहे.

घरात तलवार ठेवली; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
चंद्रपूर : घरात तलवार लपवून ठेवणाऱ्याला स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. तान्हा पोळ्याच्या दिवशी छत्रपती नगर वाॅर्डात भूषण मोतिलाल उसरेटी (वय ४३) रा. छत्रपती नगर वाॅर्ड बियाणी नगर याला अटक करून त्याच्यावर कलम ४२५ अन्वये गुन्हा दाखल करून पाच हजार रुपये किमतीची तलवार जप्त केली आहे.
तान्हा पोळा सणानिमित्त शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस अधीक्षक यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे एलसीबीकडून ऑलआऊट मोहीम व गुन्हेगार शोधमोहीमकरिता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार व त्याची चमू तपासणी करत होती. दरम्यान, छत्रपती नगर वाॅर्डातील भूषण मोतिलाल उसरेटी याने आपल्या घरी धारदार स्टीलची तलवार लपवून ठेवली असल्याची माहिती मिळाली.
या माहितीवरून पोलिसांनी छापा टाकला असता, घरातील बेडरूममध्ये दिवाणाच्या खाली लपवून ठेवलेली स्टीलची धारदार तलवार आढळून आली. पोलिसांनी ती तलवार जप्त करून रामनगर ठाण्यात गुन्हा दाखल केला. ही कारवाई पोलिस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात पोलिस हवालदार संजय आतकुलवार, संतोष येलपुलवार, नितीन रायपुरे, गोपाल आतकुलवार आदींनी केली आहे.