शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

जीव धोक्यात घालून पिकांची राखण

By admin | Updated: October 12, 2015 01:28 IST

उद्याचे स्वप्न डोळ्यात साठवून शेतीवर अतोनात खर्च केला. उसनवारीने कर्ज घेऊन शेती पिकविली.

उपाययोजना हवी : अतोनात खर्चानंतरही वन्यप्राणी करीत आहे पिकांना उद्ध्वस्तप्रकाश काळे गोवरीउद्याचे स्वप्न डोळ्यात साठवून शेतीवर अतोनात खर्च केला. उसनवारीने कर्ज घेऊन शेती पिकविली. आता शेतीपिके फळावर आली असताना कपाशी, सोयाबिन, मिरची, तूर पिकात वन्यप्राण्यांचा भरदिवसा शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत धुमाकूळ सुरु आहे. शेतकऱ्यांनी आर्थिक चणचण असतानाही मोठ्या मेहनतीने पिक उभे केले. मात्र वन्यप्राण्यांचे कळप शेतात हाती आलेले पिक उद्ध्वस्त करीत आहे. यावर पायाबंद घालण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून बळीराजा शेतपिकांची राखण करीत आहे. राजुरा तालुक्यातील कोळसा खाण परिसरात वेकोलिने मातीचे महाकाय ढिगारे टाकले. या ढिगाऱ्यावर काटेरी वनस्पतींनी अतिक्रमण केल्याने झुडपी जंगल निर्माण झाले. ३० वर्षापूर्वी असे जंगल अस्तित्वात नसल्याने वन्यप्राण्यांचा त्यावेळी शेतात धुमाकूळ नसायचा. जंगलातील प्राणी जंगलातच राहायचे. मात्र माणसाने जंगले पूर्णत: नष्ट केल्याने वन्यप्राण्यांनी शेताकडे धाव घेतली.त्याचा विपरित परिणाम आता शेतीवर होऊ लागला आहे. गोवरी, सास्ती, पोवनी, साखरी परिसरात वन्यप्राण्यांचा पूर्वी त्रास नसायचा. एखादा वन्यप्राणी शेतात चुकून आलाच तर शेतकरी त्याला हुसकावून लावायचे. मात्र वन्यप्राण्याचा कळपच आता दिवस-रात्र फळावर आलेले पीक उद्ध्वस्त करीत आहे. शेतात लावलेल्या कुंपणालाही प्राणी जुमानत नसल्याने शेतकऱ्यांनी आता काय करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या शेतात कापूस फुटून आहे. तर सोयाबिन कापणी सुरु आहे. जंगलात वन्यप्राण्यांना खायला काहीच मिळत नसल्याने उभ्या पिकांत धुमाकूळ घातला आहे. मात्र यावर पायाबंद घालणारी कोणतीच यंत्रणा शेतकऱ्यांजवळ नाही. त्यामुळे डौलदार पिकांची एका रात्रीतून वाट लावली जात आहे. पिकांवर केलेला खर्च पाण्यात जाण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. वन्यप्राण्यांचे कळप माणसाला भीत नसल्याने शेतकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. पिकांची जोपासना केली तरच मुलाबाळांच्या शिक्षणाचा खर्च पूर्ण करता येईल, अशी आस शेतकऱ्यांना आहे. कुटुंबाचा भार पेलताना शेतकऱ्यांची होणारी कसरत काळजाचा ठोका चुकविणारी आहे. जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी अन्नधान्य पिकवतो. मात्र त्याने पिकविलेली चतकोर भाकरही त्याला खाता येत नाही.संपूर्ण यंत्रणाच शेतकऱ्यांच्या विरुद्ध उभी ठाकल्याने शेतकरी पूर्णत: हादरुन गेला आहे. एकीकडे अस्मानी संकट तर दुसरीकडे सुल्तानी संकट शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही.एकूण सर्वच परिस्थितीच शेतकऱ्यांसाठी मारक असल्याने हाडाची काडी करणाऱ्या शेतकऱ्यांनी कुठपर्यंत हाल सहन करायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. शेतीचा व्यवसायच पार ढासळत चालल्याने आर्थिक चणचणीत सापडलेला शेतकरी परिस्थितीचा गुलाम होऊन जगतो आहे. शेतकऱ्यांच्या कुटुंबाची होत असलेली ससेहोलपट अनेकांना अस्वस्थ करणारी आहे. मात्र आजवर शासकीय यंत्रणेने यावर कोणताच रामबाण उपाय शोधला नाही. शेतकऱ्यांच्या जीवनाशी चाललेला हा खेळ कधी संपणार आणि कधी शेतकरीदादा सुखाचा अनुभव घेणार, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.