शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

‘नवोदय’च्या वंचितांना न्याय

By admin | Updated: February 7, 2015 00:34 IST

पंचायत समिती गोंडपिंपरी अंतर्गत नवोदय परीक्षेपासून वंचित असलेल्या सात शाळांतील ५९ विद्यार्थ्यांना पात्रता परीक्षेला बसवण्यासाठी मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या प्रयत्नांना यश आले आहे.

चंद्रपूर : पंचायत समिती गोंडपिंपरी अंतर्गत नवोदय परीक्षेपासून वंचित असलेल्या सात शाळांतील ५९ विद्यार्थ्यांना पात्रता परीक्षेला बसवण्यासाठी मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. उद्या ७ फेब्रुवारीला होणाऱ्या पात्रता परीक्षेला हे विद्यार्थीही बसू शकतील. जिल्हा परिषद प्रशासन व पुरोगामी शिक्षक समितीने घेतलेल्या पुढाकाराने हे शक्य झाले आहे.गोंडपिंपरी पंचायत समितीमधील काही शाळांतील विद्यार्थ्यांना अद्यापही प्रवेशपत्र प्राप्त झाले नाही, अशी तक्रार पुरोगामी शिक्षण समितीला प्राप्त झाल्यानंतर नवोदय समितीचे जिल्हा प्रमुख असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत संघटनेने कल्पना दिली व विद्यार्थ्यांना परीक्षेला बसवण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली. योगायोगाने यावेळी जिल्हाधिकारीपदाचा प्रभार जि.प. चंद्रपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील यांच्याकडेच होता. सलिल यांनी त्वरीत लक्ष घालून ठिकठिकाणी संपर्क केला. शाळांकडून दुसरे अर्ज भरून नवोदय समिती दिल्लीकडे प्रस्ताव सादर केला. यावेळी शिक्षण सभापती देवराव भोंंगळे यांनी विशेष लक्ष देवून विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न केले.३ फेब्रुवारीला रात्री हे अर्ज शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रविकांत देशपांडे यांनी विशेष दुताद्वारे नवोदय विद्यालय तळोधी येथे पोहोचते केले. अर्ज मंजुरीसाठीची उर्वरित प्रक्रिया करण्यासाठी नवोदय विद्यालयाचे प्राचार्य साहेबेवार व कर्मचारी घमे, धाबर्डे यांनीही मोलाचे प्रयत्न केले. अशाप्रकारे अनेकांच्या सहकार्याने वंचित ५९ विद्यार्थ्यांना नवोदय पात्रता परीक्षेला बसण्याची अशक्यप्राप्त संधी प्राप्त झाली. पुरोेगामी शिक्षक समितीचे विजय भोगेकर, हरिश ससनकर, ब्रम्हानंद मडावी, निखील तांबोळी यांनी संपूर्ण घटनाक्रम प्रशासनाच्या लक्षात आणून दिले.मात्र गोंडपिपरी पंचायत समितीमधील एका अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकण्याची वेळ आली होती, हे विशेष (प्रतिनिधी)