शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: विजयी घोषणेपूर्वीच सुनेत्रा पवारांचं सर्व कार्यकर्त्यांना भावूक आवाहन, म्हणाल्या...
2
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
3
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
4
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
5
दोन राज्यांतून भाजपसाठी वाईट बातमी; गेल्या वेळी शून्य, आता फक्त ५ जागांवर आघाडी
6
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
7
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
8
भीषण अपघात! प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ६ जणांचा मृत्यू
9
तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला...
10
युद्ध थांबणार की ठिणगी पडणार? इराणचा पाकिस्तानमार्गे ट्रम्प यांना निरोप; अटी वाचून व्हाल थक्क!
11
Video - बापरे! चावीच हरवली... कर्नाटकात हातोड्याने तोडावं लागलं EVM स्ट्रॉन्ग रूमचं कुलूप
12
रितेश देशमुखचा वेडा चाहता! रत्नागिरीच्या पठ्ठ्याने 'राजा शिवाजी' सिनेमा पाहण्यासाठी बुक केलं अख्खं थिएटर
13
अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: भीती, नैराश्य, संकटांपासून मुक्तीसाठी पठण करा 'गणेश रक्षा मंत्र'
14
केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी...
15
ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणारे भाजपचे '५' नायक; या नेत्यांनी शांतपणे बंगालची समीकरण बदलली
16
IPL 2026: 'टेबल टॉपर' पंजाब किंग्जचा सलग दुसरा पराभव, श्रेयस अय्यर 'या' गोष्टीवर संतापला...
17
मोफत ८ ग्रॅम सोने अन् दरमहा २५०० रूपये...; कोणती ५ आश्वासने ज्यानं अभिनेता विजयची जादू चालली?
18
"हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे, विजयी जल्लोष नको, गुलालही उधळू नका" सुनेत्रा पवार भावूक!
19
इकडे 'विजय'चा राजकीय उदय, तिकडे 'सन टीव्ही'च्या स्टॉकला उतरती कळा; काय आहे कनेक्शन?
20
भाजपाचा विजय निश्चित होताच शुभेंदू अधिकारींचं मोठं विधान, विजयाचं गुपित उघड करत म्हणाले....
Daily Top 2Weekly Top 5

ब्रह्मपुरी-नागभीड रस्त्याचा प्रवास झाला जीवघेणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 01:12 IST

नागभीड-ब्रह्मपुरी रस्ता म्हणजे डोकेदुखीच. या रस्त्यावरून मार्गक्रमण करताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते.

जागोजागी खड्डे : पावसाळ्यात राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला सुरुवातलोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : नागभीड-ब्रह्मपुरी रस्ता म्हणजे डोकेदुखीच. या रस्त्यावरून मार्गक्रमण करताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते. या रस्त्याचे बांधकाम ऐन पावसाळ्यात केले जात असल्याने आखून दिलेल्या रेषेच्या आत वाहन चालविताना हा प्रवास जीवघेणा ठरत आहे़मागील वर्षापासून या राज्यमार्गाची अवस्था दयनीय असताना यावर्षी हा रस्ता राज्यमार्गातून राष्ट्रीय मार्गात रुपांतरित झाल्याने या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे़ रस्त्याच्या दोन्ही बाजूला खोदकाम सुरू असल्याने एक प्रकारची लक्ष्मणरेषा आखण्यात आली आहे. या लक्ष्मणरेषेच्या बाहेर वाहनधारकांना जाता येत नाही़ परंतु ज्या पूर्वीच्या डांबरीकरणावरून वाहतूक सुरू आहे, त्या डांबरीकरणावर जागोजागी खड्डे पडल्याने वाहन चालविताना दमछाक होत आहे़ या बाबीकडे कुणाचेही लक्ष नाही. अशा स्थितीत सध्या हा रोड वाहनधारकांसाठी डोकेदुखी ठरत आहे़ लोंडीग ट्रक या मार्गावरून चंद्रपूर, नागपूर, रायपूर, जवलपूरकडे जात असताना लहान वाहनधारकांना त्यांच्यापासून सतर्क राहून आपली वाहने चालवावी लागत आहे़ किमान पूर्वीच्या डांबरीकरणावर डांबर लावून तो रस्ता योग्य बनविणे आवश्यक आहे. रस्त्याच्या दुतर्फा रूंदीकरणाचे काम करण्यासाठी खोदकाम केले असल्याने वाहन कुठून व कसे चालवावे, हा प्रश्न निर्माण होत आहे़ वाहतूक सुरू असलेल्या रस्त्यावरच मोठे पाईप टाकण्यात आल्याने अर्धा रस्ताच बंद झाला आहे. या मार्गावरून गंभीर रुग्ण नागपूरला रवाना करताना रस्त्याच्या दैनावस्थेमुळे रूग्ण आणखी गंभीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सायकल किंवा दुचाकी वाहनधारकांना तर मोठी कसरत करावी लागत आहे. महागड्या चारचाकी वाहनांची तर एैसीतैसी होत आहे़ या प्रकाराकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने वाहनधारक संतापले आहेत. रस्त्याच्या अशा दैनेमुळे अपघात होऊन एखाद्याचा बळी गेला तर याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. किमान सुरू असलेल्या रस्त्याची डागडूजी करून रस्ता वाहन चालविण्यायोग्य बनवावा.