शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

वढोली येथे जनजागरण व आरोग्य मेळावा

By admin | Updated: December 20, 2014 22:37 IST

गोंडपिपरी तालुक्यातील वढोली येथे चंद्रपूर जिल्हा पोलीस, आदिवासी विकास विभाग, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प व महसूल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागरण मेळावा व आरोग्य शिबिर पार पडले.

आक्सापूर : गोंडपिपरी तालुक्यातील वढोली येथे चंद्रपूर जिल्हा पोलीस, आदिवासी विकास विभाग, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प व महसूल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागरण मेळावा व आरोग्य शिबिर पार पडले. यामध्ये विविध विभागाचे आकर्षक स्टॉल लावण्यात आले होते.या कार्यक्रमाचे उद्घाटन गोंडपपरीचे तहसिलदार मल्लीक विरानी यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी वढोलीच्या सरपंच मिना इटेकर होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून तालुका वैद्यकीय अधिकारी धात्रक, नायब तहसिलदार बनसोड, तंटामुक्त अध्यक्ष राजेश कवठे, उपसरपंच विलास चौधरी, पोलीस पाटील संघटना अध्यक्ष गुणाकर कुबडे, विस्तार अधिकारी चन्नावार, पानलोट समिती अध्यक्ष सुरज माडूरवार, विद्युत वितरणचे कार्यकारी अभियंता ठाकरे आदी उपस्थित होते. या जनजागरण व आरोग्य मेळाव्यात रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्त संक्रमणासाठी आरोग्य विभागाच्या चमुने काम पाहिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोंडपिपरीचे पोलीस निरीक्षक बासनवार यांनी केले. यावेळी जि.प. उच्च प्राथमिक शाळा, सरस्वती विद्यालय, माता जगदंबा कृषी तंत्रनिकेतन, जनसेवा कनिष्ठ विद्यालय वढोली येथील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेऊन रंगारंग कार्यक्रम सादर केले. यावेळी आकांक्षा चनकापुरे हिच्या मराठी लावणीने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.या जनजागरण व आरोग्य मेळाव्यात हुंडाबळी, आत्महत्या, दुष्काळ परिस्थितीवर मात करण्यासंदर्भात रंगीबेरंगी पोलीस प्रशासनाच्या वतीने रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. रांगोळ्या नागरिकांच्या लक्षवेधी ठरल्या. तसेच महसूल प्रशासन, कृषी विभाग, आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण विभाग, वीज वितरण कंपनी, पंचायत समिती आदी कार्यालयामार्फत जनजागृतीसाठी प्रदर्शन स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलविषयी संपुर्ण विभागातर्फे सविस्तर माहिती देण्यात आली. परिसरातील विद्यार्थ्यांमध्ये खेळण्याची आवड निर्माण होऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, याकरिता वढोली व पुर्डी हेटी येथील विद्यार्थ्यांना क्रिकेटचे व व्हॉलीबॉलचे साहित्य पोलीस विभागातर्फे देण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. संचालन सचिन फुलझेले तर आभार आमटे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिन बोरकर, राहुल चहारे, प्रभाकर उमरे, प्रभु पुराण, राजू महाकाळकर, महेंद्र यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)