पोंभूर्णात जबरानजोत शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:27 IST2021-09-11T04:27:36+5:302021-09-11T04:27:36+5:30

घोसरी : वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आदिवासी व गैरआदिवासी जबरानजोत शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन वंचितचे विदर्भ समन्वयक राजू झोडे ...

Jabranjot farmers' dam agitation in Pombhurna | पोंभूर्णात जबरानजोत शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन

पोंभूर्णात जबरानजोत शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन

घोसरी : वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आदिवासी व गैरआदिवासी जबरानजोत शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन वंचितचे विदर्भ समन्वयक राजू झोडे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी पोंभूर्णातील नगरपंचायत चौकात धरणे आंदोलन करून मागणीचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.

पोंभूर्णा येथील नगरपंचायत चौकात झालेल्या आंदोलनात मार्गदर्शन करताना राजू झोडे यांनी तीन पिढ्यांची जाचक अट रद्द करण्यात यावी, वनहक्क कायद्यानुसार आदिवासी-गैरआदिवासींना जमिनीचे पट्टे देण्यात यावे, वन विभागाचा शेतकऱ्यांवरचा वाढता अन्याय बंद करण्यात यावा, जबरानजोत शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा तत्काळ निपटारा करावा, वहिवाट झाल्याशिवाय शेतकऱ्यांच्या शेतात मुनाऱ्या टाकू नये, या प्रमुख मागण्या लावून धरल्या.

यावेळी वंचितचे विदर्भ समन्वयक राजू झोडे, जिल्हा उपाध्यक्ष श्यामकांत गेडाम ,जिल्हा सदस्य मधुकर उराडे, आयटी सेलचे चंद्रपूर जिल्हा प्रमुख अविनाशकुमार वाळके, तालुका अध्यक्ष चंद्रहास उराडे, तालुका महासचिव रवी तेलसे, शहराध्यक्ष राजू खोब्रागडे, युवा अध्यक्ष अतुल वाकडे, विजय दुर्गे, मंगल लाकडे, रेकचंद चंदावार व शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

100921\img-20210909-wa0095.jpg

पोंभूर्ण्यांत जबरानजोत शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन

Web Title: Jabranjot farmers' dam agitation in Pombhurna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.