धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस व धान खरेदीची रक्कम अदा करण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 05:00 IST2021-09-10T05:00:00+5:302021-09-10T05:00:25+5:30
शासन निर्णयान्वये आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप हंगाम २०२०-२१ मधील खरेदी केलेल्या दराव्यतिरिक्त धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ७०० रुपये प्रोत्साहनपर राशी राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आली आहे. या प्रोत्साहनपर राशीची रक्कम अदा करण्यासाठी शेतकरी व अभिकर्ता संस्थांकडे वर्ग करण्यात आली असल्याची माहिती अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे, अशी माहिती माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस व धान खरेदीची रक्कम अदा करण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस व धान खरेदीची रक्कम अदा करण्याच्या दृष्टीने २१ डिसेंबर २०२० रोजीच्या शासन निर्णयान्वये आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप हंगाम २०२०-२१ मधील खरेदी केलेल्या दराव्यतिरिक्त धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ७०० रुपये प्रोत्साहनपर राशी राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आली आहे. या प्रोत्साहनपर राशीची रक्कम अदा करण्यासाठी शेतकरी व अभिकर्ता संस्थांकडे वर्ग करण्यात आली असल्याची माहिती अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे, अशी माहिती माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
खरीप व रबी हंगामातील धान खरेदीची संपूर्ण रक्कम अभिकर्ता संस्थांकडे वर्ग करण्यात आली आहे. अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आमदार मुनगंटीवार यांना पत्र पाठवून ही माहिती कळवली आहे.
खरीप व रबी हंगाम २०२०-२१ मधील धानानुसार धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रदान करावयाच्या प्रोत्साहनपर राशी तसेच खरेदीची रक्कम थकीत होती. यासाठी सुमारे ८०० कोटी रुपये रक्कम थकीत असताना केवळ ३०० कोटी रुपये रक्कम मंजूर केली. राज्य सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात येणाच्या बोनसची रक्कम पूर्णपणे प्रदान न केल्यामुळे चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या चार जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. अशातच पुन्हा मुसळधार पावसाने धान उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत भर घातली गेली. या संदर्भात मुख्यमंत्री, अन्न नागरी पुरवठा मंत्री यांच्याशी अनेकदा पत्रव्यवहार केला होता. तसेच प्रत्यक्ष भेटून विनंती केली होती, अशी माहितीही आमदार मुनगंटीवार यांनी दिली.