शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

बल्लारपूर आगारात होते लाकडांची अदलाबदल

By admin | Updated: March 20, 2015 01:09 IST

बल्लारपूर येथील लाकूड विक्री आगारात लावलेल्या लॉटमधून लाकडाची परस्पर विक्री होत आहे. तसेच लाकडाची अदलाबदली करण्याचा प्रकार संबंधितांकडून होत आहे.

कोठारी : बल्लारपूर येथील लाकूड विक्री आगारात लावलेल्या लॉटमधून लाकडाची परस्पर विक्री होत आहे. तसेच लाकडाची अदलाबदली करण्याचा प्रकार संबंधितांकडून होत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देवून तसा प्रकार करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.बल्लारपूर येथे वनविभागाचे मध्यवर्ती लाकूड विक्री आगार आहे. या आगारात चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील उत्कृष्ठ इमारती लाकूड विक्रीसाठी दररोज येते. यात महिन्यातून एकदा किंवा दोनदा लाकूड खरेदीदारांना बोलावून विक्री करण्यात येत. बल्लारपूर आगारातील लाकडे चांगल्या प्रतीची असल्याने येथील लाकडांना बाजारात चांगली पसंती मिळते. त्यामुळे आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान आदी राज्यातील ठेकेदार लाकडे खरेदीसाठी गर्दी करतात.या आगारात २५ ते ३० लाकडांचे प्लाट आहेत. प्रत्येक प्लॉटवर सागवान व सिसमसह इतर इमारतीचे लॉट विक्रीसाठी लावण्यात येतात. मात्र विक्रीसाठी लावलेल्या प्लॉटमधून लाकडाची परस्पर विक्री किंवा विक्री केलेल्या लॉटमधून लाकडांची अदलाबदली करण्याचा प्रकार मागील अनेक दिवसापासून सुरू आहे. हा सर्व प्रकार संबंधित अधिकाऱ्यांच्या नजरेआड कसा होत आहे, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. असाच काहीसा प्रकार प्लॉट क्रमांक ३७२३ मध्ये करण्यात आला. यात प्लॉटमध्ये ३६ सागवानी नग होते. मात्र त्यातील सात नग बदलविण्यात आले. त्याचा आकारही जुळत नाही. बदलविण्यात आलेल्या लाकडावर गेरू मारून नसल्याने सदर प्रकार लक्षात आला. ठेकेदारांनी लाखो रुपये मोजून प्लॉट खरेदी करायचे मात्र त्यात अदलाबदली करून ेस्वत:चे खिसे गरम करण्याचा प्रकार सर्रासपणे सुरू आहे. आगारावर नियंत्रण ठेवणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यां मार्फत हा प्रकार सुरू असल्याचे बोलल्या जात आहे. या प्रकाराची वरिष्ठांमार्फत चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू असून त्याकडे वरिष्ठांचे कायम दुर्लक्ष होत आहे. परिणामी संबंधिताना मोठा आर्थिक फटका बसत आहे. (वार्ताहर)