शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

२४ हजार शेतकऱ्यांना ४३.५२ कोटींचा विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 22:54 IST

राजेश मडावी।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : २०१७ च्या खरीप हंगामात जिल्ह्यातील ४१ हजार १६० शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. कर्जदार आणि बिगरकर्जदार शेतकऱ्यांच्या शेतीचे उंबरठा उत्पन्न पीक विम्याच्या निकषात पात्र ठरल्याने २४ हजार ७१८ शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. मंजूर विम्याची एकूण रक्कम ४३ कोटी ५२ लाख ३६ हजार ९५८ रूपये असून ...

ठळक मुद्देपीक विमा योजनेत वाढला शेतकऱ्यांचा सहभाग : विम्याची रक्कम होणार बँक खात्यात जमा

राजेश मडावी।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : २०१७ च्या खरीप हंगामात जिल्ह्यातील ४१ हजार १६० शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. कर्जदार आणि बिगरकर्जदार शेतकऱ्यांच्या शेतीचे उंबरठा उत्पन्न पीक विम्याच्या निकषात पात्र ठरल्याने २४ हजार ७१८ शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. मंजूर विम्याची एकूण रक्कम ४३ कोटी ५२ लाख ३६ हजार ९५८ रूपये असून एक महिन्यात संबंधित शेतकºयाच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी धान, गहू आणि सोयाबीन उत्पादक बहुसंख्यांक शेतकऱ्यांनी पीक विम्याचा लाभ घेण्यासाठी संबंधित यंत्रणेकडे अर्ज सादर केला होता. कृषी विभागाच्या जागृृतीमुळे पीक विम्याची रक्कम वाढल्याचे स्पष्ट झाले आहे़जिल्ह्यातील शेती प्रामुख्याने पावसावर आधारीत असून ८५ टक्के क्षेत्र कोरडवाहू आहे. अतिवृष्टी अथवा पावसातील खंड आणि किड रोगांच्या प्रादुर्भावामुळे उत्पन्नात मोठी घट होते़ लागवडीचा खर्चदेखील निघत नाही़ त्यामुळे हे नुकसान टाळण्यासाठी शासनाकडून प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे़२०१८- १९ या खरीप हंगामातील पीक विमा योजनेत कर्जदार शेतकºयांना सहभाग घेण्यासाठी अंतीम मुदत ३१ जुलै २०१८ तर बिगर कर्जदारी शेतकऱ्यांनी २४ जुलै २०१८ अशी जाहीर करण्यात आली आहे़ शासनाने अधिसुचित केलेल्या क्षेत्रातील विविध पिके घेणारे (कुळाने अथवा भाडेकराराने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह) या योजनेत सहभाग घेवू शकतात़ मागील वर्षाच्या खरीप हंगामात जिल्ह्याकरिता भारतीय कृषी विमा कंपनीची नेमणूक करण्यात आली होती. या कंपनीकडे ६ हजार ५६४ कापूस उत्पादक शेतकरी, २४ ज्वारी उत्पादक ३० हजार ४६४ धान उत्पादक आणि ३ हजार ६०९ सोयाबीन उत्पादन घेणाºयांनी असे एकून ४१ हजार १६० शेतकऱ्यांनी विमा काढला होता. या शेतकऱ्यांची विम्यापोटी ४९ कोटी ७१ लाख४४ हजार ६१ रुपयांची रक्कम प्रिमियम म्हणून सदर कंपनीला भरली होती. त्यापैकी २४ हजार ७१८ शेतकºयांना पीक विम्याचा लाभ मिळणार आहे. उर्वरित १६ हजार ४४२ शेतकºयांचे उंबरठा उत्पन्न पीक विम्याच्या निकषात न बसल्याने लाभ मिळू शकला नाही. यंदाच्या खरीप हंगामासाठी आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. मागील खरीप हंगामात विमा काढण्यासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांनीच कानाडोळा केला होता़ यंदा असे कदापि घडणार नाही, असा दावा सुत्रानी केला आहे़विम्यासाठी आवश्यक कागदपत्रेखरीप हंगाम २०१८ पासून सहभाग घेण्यासाठी विमा प्रस्ताव बँकेला सादर करताना बिगर कर्जदार शेतकºयांनी छायाचित्र असलेले बँक खाते पुस्तकाची प्रत, आधारकार्ड छायांकित प्रत सादर करावा. आधारकार्ड उपलब्ध नसल्यास संबंधित कार्डची नोंदणी पावतीसोबत खालीलपैकी कोणताही एक फोटो असलेला पुरावा मान्य केला जाईल. मतदान ओळखपत्र, किसान क्रेडीटकार्ड, नरेगा जॉबकार्ड किंवा वाहनधारक परवाना सादर करता येवू शकते़ पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी कर्जदार शेतकऱ्यांनी बँकेच्या कर्जखात्याशी आधार क्रमांक जोडण्यासाठी बँकेशी संपर्क साधावा.आॅनलाईनचा खोडाअर्ज भरण्यासाठी बँँकांमध्ये संभाव्य गर्दी टाळता यावी व बिगरकर्जदार शेतकऱ्यांना अर्ज भरण्यास सुलभता यावी म्हणून या हंगामापासून शेतकºयांचे अर्ज आॅनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील. याकरिता सी. एस. सी. ई. गर्व्हनंस सर्व्हिसेस इंडियाद्वारे कार्यान्वित ‘आपले सरकार सेवा केंद्र’ (डिजिटल सेवा केंद्र) विमा कंपनीच्या वतीने विमा अर्ज भरण्यास मदत करतील़ विमा हप्ता स्वीकारतील़ याकरिता प्राधिकृत ‘आपले सरकार सेवा’ केंद्राचे चालक विमा योजनेचे अर्ज आॅनलाईन पद्धतीने भरतील. विमा प्रस्तावाकरिता सातबारा उतारा, आधारकार्ड, बँक खात्याचा तपशील आदी अर्जास आॅनलाईन पद्धतीने जोडतील. पण, आॅनलाईन अटीमुळे अर्ज सादर करणाऱ्यांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे़यंदा स्थानिक हवामान केंद्रांची घेणार मदतमहावेध प्रकल्पाअंतर्गत जिल्ह्यात ५० स्वयंचलित हवामान केंद्राद्वारे प्राप्त होणाऱ्या माहितीच्या आधारे पीक विमा योजनेचा लाभ देण्यात येणार आहे़ शिवाय, कृषी सल्ला, मार्गदर्शन, हवामान संशोधन, आपत्ती व्यवस्थापन आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्राप्त माहितीचा वापर केला जाईल़ प्रत्येक स्वयंचलित हवामान केंद्राद्वारे तापमान, पर्जन्यमान, सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा वेग व दिशा रियल टाईम माहितीची नोंद दर १० मिनिटांनी उपलब्ध होईल़ कर्जदार ३१ जुलै तर बिगर कर्जदार शेतकरी २४ जुलै २०१८ पूर्वी योजनेत सहभागी होवू शकतात अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. ए. आर. हसनाबादे यांनी दिली.विमा संरक्षणाची अटपीक पेरणीपासून काढणी पर्यंतच्या कालावधीत उत्पादनात येणारी घट, पीक पेरणी व लावणीपूर्व तसेच हंगामातील प्रतिकुल परिस्थितीत नुकसान भरपाई निश्चित करणे व काढणी पश्चात नुकसान झाल्यास स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळतो. मागील हंगामात ४१ हजार १६० शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. त्यातील २४ हजार ७१८ शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. शासनाच्या निकषात बसल्यामुळेच हे शेतकरी विमा लाभासाठी पात्र ठरले. त्यामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड न होता या योजनेत कसा सहभाग वाढेल, या हेतूने जागृती सुरू असल्याचा दावा कृषी तंत्र अधिकारी राज वानखेडे यांनी ‘लोकमत‘ शी बोलताना केला.नागभीड तालुक्याला मिळणार साडेआठ कोटीनागभीड : पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत २०१७ च्या खरीप हंगामातील भरपाईपोटी तालुक्याला ८ कोटी ३४ लाख ८० हजार रुपये मिळणार आहे़ तालुक्यात प्रामुख्याने धानाचे पीक घेतले जाते. मागील हंगामात या पिकावर विविध रोगांनी आक्रमण केल्यामुळे पीक नष्ट झाले होते. सेवा सहकारी संस्थांनी सभासदांंना कर्जाचे वितरण करताना प्रत्येक सभासदांच्या पिकाचा विमा काढला होता. त्यामुळे तालुक्यात ३ हजार ८६१ शेतकरी पीक विम्यासाठी पात्र ठरले. सेवा सहकारी व आदिवासी विविध कार्यकारी संस्थांच्या वतीने प्रत्यक्ष पतपुरवठा करणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ४ शाखा असून नागभीड, नवेगाव पांडव, तळोधी व पाहार्णी आदी शाखांचा समावेश आहे.यातील नागभीड शाखेअंतर्गत १ हजार १९४ शेतकरी असून त्यांना २ कोटी ७० लाख रुपये, नवेगांव पांडव शाखेअंतर्गत ५७३ शेतकरी असून १ कोटी ९ लाख रुपये, तळोधी शाखेअंतर्गत १६८१ शेतकरी आहेत़ त्यांना ३ कोटी ८५ लाख रुपये आणि पाहार्णी शाखेअंतर्गत ४१३ शेतकऱ्यांना ७० लाख रूपयांचा पीक विमा मंजूर झाला आहे. लवकरच खरीप हंगाम सुरू होणार आहे़ त्याअगोदरच शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम केल्यास आर्थिक अडचण दूर होणार आहे़ त्यासाठीच बँकेला सूचना देण्यात आली, अशी माहिती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक गजानन पाथोडे यांनी दिली.