शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
3
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
4
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
5
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
6
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
7
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
8
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
9
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
10
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
11
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
12
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
13
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
14
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
15
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
16
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
17
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
18
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
19
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
20
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय शिक्षणात ओबीसी विद्यार्थ्यांवर अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 05:00 IST

ओबीसींसाठी २७ टक्के आरक्षणाची तरतूद असताना २०२०-२१ या शैक्षणिक सत्रात केंद्रीय कोट्या केवळ ३.८ टक्के आरक्षण ठेवण्यात आले. त्यामुळे केंद्र सरकारकडून ओबीसी विद्यार्र्थ्यांवर अन्याय झाला आहे. ओबीसींना शिक्षणात २७ टक्के आरक्षण आहे. देशभरात वैद्यकीय प्रवेशासाठी ६६ हजार ३३३ जागामधून १५ टक्के जागा म्हणजे ९ हजार ९५० जागा केंद्रीय कोट्यात आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देराष्ट्रीय ओबीसी महासंघ : केंद्रीय कोट्यात केवळ ३.८ टक्के आरक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : वैद्यकीय शिक्षणात ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांवर अन्याय झाला असून आरक्षणासंदर्भात योग्य निर्णय घेऊन पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने तहसीलदारमार्फ त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.ओबीसींसाठी २७ टक्के आरक्षणाची तरतूद असताना २०२०-२१ या शैक्षणिक सत्रात केंद्रीय कोट्या केवळ ३.८ टक्के आरक्षण ठेवण्यात आले. त्यामुळे केंद्र सरकारकडून ओबीसी विद्यार्र्थ्यांवर अन्याय झाला आहे. ओबीसींना शिक्षणात २७ टक्के आरक्षण आहे. देशभरात वैद्यकीय प्रवेशासाठी ६६ हजार ३३३ जागामधून १५ टक्के जागा म्हणजे ९ हजार ९५० जागा केंद्रीय कोट्यात आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. या कोट्यात ओबीसी विद्यार्थ्यांच्या वाट्याला २७ टक्के आरक्षणानुसार २ हजार ५७८ जागा येणे अपेक्षित होते. परंतु केवळ ३७१ जागा म्हणजे ३.८ टक्के आरक्षण मिळाले आहे. खुल्या वर्गातील उमेदवारांना तब्बल ७ हजार १२५ जागा देण्यात आल्या आहेत. या प्रकाराने वैद्यकीय प्रवेशात ओबीसी उमेदवारांवर अन्याय झाला आहे.ओबीसींची मते मागायची आणि त्यांना डावलून घटनेने दिलेले आरक्षणही कमी करण्याचा केंद्र्र सरकारचा डाव असल्याचे दिसून येते. ओबीसी उमेदवारांना केवळ केंद्रीय शैक्षणिक संस्था केंद्रीय महाविद्यालयात आणि केंद्रीय विद्यापीठात २७ टक्के आरक्षण देण्यात येत आहे, असे केंद्र सरकारने सांगितले आहे.मात्र, त्यामध्ये उर्वरित वैद्यकीय महाविद्यालय व विद्यापीठात अनुसूचित जाती आणि जमातीप्रमाणे ओबीसींना त्यांच्या हक्काचे आरक्षण का दिले जात नाही, असा प्रश्न राष्ट्रीय ओबीसी महासंघाने निवेदनात उपस्थित केला आहे. निवेदन देताना राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे गणपती मोरे, योगेश पोतराज, नरेश ताजने, दिलीप धोबे, प्रमोद आगलावे, मंगेश धोबे आदी उपस्थित होते.

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणStudentविद्यार्थी