शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
4
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
5
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
6
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
7
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
8
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
9
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
10
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
11
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
12
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
14
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
15
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकांवर अन्याय

By admin | Updated: October 6, 2016 01:43 IST

जिल्हा परिषदेतील मुख्याध्यापकांना सेवा ज्येष्ठता आणि गुणवत्तेच्या आधारे गटशिक्षण आणि उपशिक्षणाधिकारी पदावर नुकतीच बढती मिळाली आहे.

संघटनेची मागणी : पदोन्नतीत होत आहे अन्याय भेजगाव : जिल्हा परिषदेतील मुख्याध्यापकांना सेवा ज्येष्ठता आणि गुणवत्तेच्या आधारे गटशिक्षण आणि उपशिक्षणाधिकारी पदावर नुकतीच बढती मिळाली आहे. यातून राज्यभरातील १०० मुख्याध्यापकांना राजपत्रित अधिकारी होण्याची संधी प्राप्त झाली असून रिक्त असलेल्या जागांवर त्यांना नियुक्ती देण्यात आली. मात्र या प्रक्रियेत आदिवासी आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकांवर अन्याय करण्यात आला आहे.शासकीय आश्रमशाळेमध्ये अनेक पदे कार्यरत आहेत. मात्र पदोन्नती करीत असताना माध्यमिक शिक्षकांना कोणत्या पदावर पदोन्नती देण्यात यावी, याबाबतचे नियम आयुक्त कार्यालयाकडून अजूनपर्यंत तयार करण्यात आलेले नाही. सध्या प्रचलित पद्धतीनुसार काठी माध्यमिक शिक्षकांना अप्पर आयुक्त स्तरावर माध्यमिक मुख्याध्यापक या पदावर पदोन्नती देण्यात येते. तसेच आयुक्त यांच्या स्तरावर माध्यमिक शिक्षकांना सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिक्षण/उपशिक्षणाधिकारी या पदावर पदोन्नती देण्याची पद्धत सुरू आहे. त्यामुळे माध्यमिक शिक्षकांचे नेमके पहिल्या पदोन्नतीचे पद कोणते या संभ्रमात कर्मचारी आहेत.सेवाज्येष्ठता असूनही मुख्याध्यापकावर अन्याय होत असून अशाप्रकारच्या पदोन्नतीने कर्मचाऱ्यांना मुख्याध्यापकाच्या हाताखाली कमी दिवसच काम करायचे आहे, पदोन्नतीनंतर अधिकारी बनत असल्याची भावना कर्मचाऱ्यांची असल्याने मुख्याध्यापकाला आश्रमशाळेत हातखालच्या कर्मचाऱ्यांकडून कामे करवून घेण्यास तारेवरची कसरत करावी लागत आहे.आश्रम शाळेतील माध्यमिक मुख्याध्यापक कोणत्याही प्रकारची पदोन्नतीची संधी नसल्याने व आश्रम शाळेत हाताखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची वरिष्ठ पदावर बढती होत जावून पुढे तेच अधिकारी त्याच आश्रमशाळेवर अधिकारी म्हणून तपासणीसाठी येतात. अशावेळी पारदर्शक तपासणी होऊ शकत नसल्याचे कर्मचारी सांगतात. तपासणीसाठी आलेले अधिकारी पूर्वी हाताखली काम केलेले कर्मचारी असल्याने पदोन्नती होत नसल्याचे शल्य मनात राहते. यातून मानसिक त्रास सहन करीत आलेल्या अधिकाऱ्यांना समोर चौकशीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आदिवासी आश्रम शाळेतील मुख्याध्यापकांनाही पदोन्नतीत सामावून घेण्याची मागणी होत असून याकडे शासनाने लक्ष द्यावे. (वार्ताहर)राज्यात ७७ ठिकाणी गटशिक्षणाधिकारी आणि २३ ठिकाणी उपशिक्षणाधिकरी म्हणून मुख्याध्यापकांना बढती देण्यात आलेली आहे. याच धर्तीवर आश्रमशाळेतील मुख्याध्यापकांना बढतीची अपेक्षा आहे. मात्र या विभागात परिस्थिती उलट आहे. आदिवासी विभागांतर्गत चालवल्या जात असलेल्या शासकीय आश्रमशाळातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांपासून तर माध्यमिक शिक्षकांपर्यंत सर्वांनाच बढती मिळते. मात्र माध्यमिक मुख्याध्यापकांना कोणत्याच निकषावर बढती मिळत नाही. त्यांना नोकरीत रुजू झाल्यापासून तर निवृत्तीपर्यंत मुख्याध्यापक पदावरच रहावे लागते. आदिवासी आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांत पदोन्नतीत दुजाभाव होत असल्याने मुख्याध्यापकांना पदोन्नतीपासून वंचित रहावे लागत आहे. आश्रम शाळेतील इतर कर्मचाऱ्यांप्रमाणेच मुख्याध्यापकांनाही पदोन्नती देण्याची मागणी मुख्याध्यापकांनी केली आहे.