शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

वीजचोरी रोखण्यासाठी इन्फ्रारेड मीटर

By admin | Updated: June 25, 2015 01:09 IST

वीज वितरण कंपनीने आता विद्युत ग्राहकांच्या घरी इन्फ्रारेड मीटर लावण्याची मोहीम सुरू केली आहे.

चंद्रपूर : वीज वितरण कंपनीने आता विद्युत ग्राहकांच्या घरी इन्फ्रारेड मीटर लावण्याची मोहीम सुरू केली आहे. वीज चोरीवर आळा घालण्यासाठी महावितरण कंपनीच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात असल्या, तरी वीज चोरी सुरूच आहे. त्यामुळे हा प्रयोग करण्यात येणार आहे. चंद्रपूर विभागात २ लाख ३१ हजार ३५६ विद्युत ग्राहक आहेत. त्यापैकी ४४ हजार ७०३ ग्राहकांच्या घरी आतापर्यंत इन्फ्रारेड मीटर लावण्यात आले आहे. महावितरण कंपनी अस्तित्वात येण्यापूर्वी महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या वतीने कारभार चालविला जात होता. महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या वतीने विद्युत ग्राहकांच्या घरी चुंबकीय तत्त्वावर आधारित वीज मीटर लावण्यात आले होते. या वीज मिटरमध्ये असलेली चक्री विशिष्ट वेळ फिरल्यानंतर १ एक एक युनिट वीज वापरल्याचे समजत होते. त्यानुसार ग्राहकांना वीज बिल दिले जात होते.मात्र, यांत्रिकी पद्धतीचा या वीज मीटरमध्ये हेराफेरी करण्याचे प्रमाण वाढले होते. विद्युत मंडळाचे सील लावले जात असले, तरी ग्राहक अनेक क्लृप्त्या करुन वीज मीटरमध्ये हेराफेरी करीत होते. कालांतराने महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, पारेषण कंपनी व अन्य एका कंपनीमध्ये विभाजन झाल्यानंतर जास्तीत जास्त उत्पन्न मिळविण्यासाठी महावितरणने जुने मीटर काढून नवीन पारदर्शक मीटर लावले आहेत. या मीटरमध्येसुद्धा हेराफेरी होत असल्याचे महावितरण कंपनीच्या निदर्शनास आले. त्यानंतर रिडींग घेण्यासाठी फोटो पद्धती अंमलात आणली. मात्र यावरही वीज चोरीचे प्रमाण थांबले नाही. त्यामुळे महावितरण कंपनीने आता इन्फ्रारेड मीटर लावण्याचा निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)