शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
4
IPL 2026 : अभिषेक-हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
5
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
6
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
7
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
8
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
9
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
10
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
11
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
12
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
13
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
15
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
16
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
17
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
18
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
19
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
20
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाला पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 05:00 IST

मागील काही वर्षांपासून शेतकरी इतर पिकांसह भाजीपाला पिकांची लागवड करीत आहे. यामध्ये वांगी, मुळा, भेंडी, मेथी, चवळी, गवार आदी पिकांचा समावेश आहे. शेतकऱ्यांनी शासकीय योजनेचे लाभ घेवून आपल्या शेतात छोट्या मोठ्या सिंचन व्यवस्था केल्या आहेत. मोटारपंपाच्या सहाय्याने पाणी पुरवठा करून भाजीपाला पिकाचे उत्पादन घेतले जात आहे. मात्र रबी हंगामात भाजीपाला पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी त्रस्त झाले असून विविध किटकनाशकांची फवारणी करीत आहेत.

ठळक मुद्देढगाळ वातावरणाचा परिणाम : सोयाबीन, कापसानंतर आता भाजीपालाही धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात शेतकरी कापूस, धानपिकासोबतच भाजीपाल्याची शेती करतात. यावर्षी रबी हंगामात भाजीपाला पिकाचे क्षेत्र वाढले आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून ढगाळी वातावरण असल्याने भाजीपाला पिकावर रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत असून विविध किटकनाशकांची फवारणी करून रोगांवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत.मागील काही वर्षांपासून शेतकरी इतर पिकांसह भाजीपाला पिकांची लागवड करीत आहे. यामध्ये वांगी, मुळा, भेंडी, मेथी, चवळी, गवार आदी पिकांचा समावेश आहे. शेतकऱ्यांनी शासकीय योजनेचे लाभ घेवून आपल्या शेतात छोट्या मोठ्या सिंचन व्यवस्था केल्या आहेत. मोटारपंपाच्या सहाय्याने पाणी पुरवठा करून भाजीपाला पिकाचे उत्पादन घेतले जात आहे. मात्र रबी हंगामात भाजीपाला पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी त्रस्त झाले असून विविध किटकनाशकांची फवारणी करीत आहेत.ग्रामीण भागातून टमाटर, वांगी व इतर पालेभाज्यांची आवक चंद्रपूर बाजारात मोठ्या प्रमाणात होत आहे. कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार शेतकरी आधुनिक पद्धतीने रबी हंगामात भाजीपाला पिकाची शेती करीत आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून ढगाळी वातावरण असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले असून कापूस, सोयाबीन पिकांचे नुकसान झाल्यानंतर आता भाजीपाला पिकही हातचे जाण्याची शक्यता आहे.गव्हावर अळीचा प्रादुर्भावपरतीच्या पावसाने थैमान घातल्याने खरिपाची पिके हातची गेली. आता रब्बीच्या पिकांवर शेतकऱ्यांची मदार आहे. हरभरा पाठोपाठ गहू पिकावर अळीचा प्रादुर्भाव झाल्याने पिके वाळत चालली आहे. त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. यावेळी सोयाबीन, कापूस आदी खरीप पिकांचे नुकसान झाल्याने मोठे नुकसान झाले. मात्र यावर्षी नदी-नाले तलाव, विहिरीत भरपूर पाणी असल्याने रब्बीची पेरणी केली. पाणी देणे, खत टाकणे हे काम सुद्धा चालू आहे. परंतु हरभरा पाठोपाठ आता गव्हाची उभी पिके वाळत चालल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.यावर्षी खरीब हंगामामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. कापूस, सोयाबीनची अक्षरश: वाट लागली. त्यामुळे सरकार आर्थिक मदत करेल या आशेवर शेतकरी आहे. तर दुसरीकडे या हंगामातील रब्बी पिकांवर ढगाळ वातावरणामुळे परिणाम पडत आहे. त्यामुळे या पिकांचेही नुकसान होण्याची शक्यता आहे.-रामदास देवाळकर, शेतकरी, गोवरी

टॅग्स :agricultureशेती