शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

अल्पवयीन मुलांच्या वाहनांवर पालकांची अप्रत्यक्ष बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 00:29 IST

दहा पट दंडाचा पालकांनी चांगलाच धसका घेतला असून काही पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलामुलींकडील दुचाकी वाहने काढून घेत त्यांच्या हाती चक्क सायकली दिल्या आहेत. शहरातील शिकवणी वर्गासमोर दुचाकी घेऊन येणारे काही विद्यार्थी आता सायकलने येत असून वर्गासमोर सायकलच्या रांगा लागत आहेत. अल्पवयीन मुला-मुलींनी वाहन चालविल्यास २५ हजार रुपये दंड असल्याने काही पालकांनी तर सायकली विकत घेऊन दिल्या आहेत. आजपर्यंत कुणाचेही न ऐकणारे विद्यार्थी निमुटपणे सायकलला पायडल मारत शाळा महाविद्यालयात आणि शिकवणीलाही जात आहेत.

ठळक मुद्देकायद्याचा धसका : बहुतांश मुलांच्या हातात आल्या पुन्हा सायकली

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मोटारवाहन कायद्यातील नव्या नियमाचा आणि दहा पट दंडाचा पालकांनी चांगलाच धसका घेतला असून काही पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलामुलींकडील दुचाकी वाहने काढून घेत त्यांच्या हाती चक्क सायकली दिल्या आहेत. शहरातील शिकवणी वर्गासमोर दुचाकी घेऊन येणारे काही विद्यार्थी आता सायकलने येत असून वर्गासमोर सायकलच्या रांगा लागत आहेत. अल्पवयीन मुला-मुलींनी वाहन चालविल्यास २५ हजार रुपये दंड असल्याने काही पालकांनी तर सायकली विकत घेऊन दिल्या आहेत. आजपर्यंत कुणाचेही न ऐकणारे विद्यार्थी निमुटपणे सायकलला पायडल मारत शाळा महाविद्यालयात आणि शिकवणीलाही जात आहेत.मोटर वाहन कायद्यातील दुरुस्ती अद्याप राज्यात लागू झाली नाही. मात्र सोशल मिडियावरुन याबाबत जनजागृती सुरु आहे. याचा चांगलाच धसका काही पालकांनी घेतल्याचे दिसत आहे. वाहतुकीचेनियम मोडल्यास दंडाच्या रक्कमेत तब्बल दहा पट वाढ होत आहे. त्यातही अल्पवयीन मुलामुंलींनी वाहन चालविल्यास २५ हजार रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. अनेक पालक आठव्या वर्गात मुलगा-मुलगी गेला की, त्याला दुचाकी देतात. शाळा, महाविद्यालय आणि शिकवणी वर्गालाही ही अल्पवयीन मुले दुचाकीने भरधाव जातात. अनेकदा पोलिसांनी याविरुद्ध मोहीमही उघडली. अनेक पालकांना दंडही झाला, परंतु आतापर्यंत असलेला नाममात्र दंड म्हणून पालक मोकळे होत होते. कुणी मनावर घेत नव्हते. मुलांच्या हट्टापुढे पालकांचेही चालत नव्हते. त्यामुळे मुले घरुन पालकांची दुचाकी घेऊन शिकवणी वर्गासह शहरातही भटकत होते. परंतु आता नवीन वाहन कायदा अस्तित्वात येत आहे. त्यात मोठ्या प्रमाणात दंड असल्याने पालकांनी मुलांकडील दुचाकीच्या चाव्या आपल्या ताब्यात घेणे सुरु केले आहेत. मुलाने कितीही आग्रह केला तरी २५ हजार रुपये दंडाचा धसका घेत पालक सध्या तरी दुचाकी देतांना विचार करताना दिसत आहे. परिणामी शाळा महाविद्यालयात आणि शिकवणी वर्गासमोरही आता सायकलचा पायडल मारत येणारे विद्यार्थी दिसत आहेत. स्टँडमधील दुचाकीची जागा हळुहळू सायकलनी घेतली आहे.जनजागृतीने जे इक्या वर्षांत झाले नाही ते केवळ दंड वाढताच शक्य होताना दिसत आहेत.श्रीमंत पालकांचे दुर्लक्षपरिवहन विभागाने अल्पवयीन वाहनचालकांवर मोठ्या दंडाची तरतूद केल्याने काही पालकांनी धसका घेतला असला तरी काही श्रीमंत पालक मात्र बिनधास्त पाल्याकडे दुचाकी देत आहेत.वाहतूक पोलिसांचे काम हलकेदुचाकी चालविणाऱ्या अल्पवयीन मुलामुलींविरुद्ध वाहतूक शाखेने आतापर्यंत अनेकदा मोहिम उघडली. शाळा महाविद्यालयासमोर उभे राहून मुलांच्या हाती चालन दिले. परंतु त्याचा फारसा परिणाम झाला नाही. मात्र दहा पट दंडाची तरतूद होताच काही पालकांनी स्वत: मुलांच्या दुचाकी काढून घेतल्या असून पोलिसांचे काम हलके होणार आहे.

शिकवणी वर्गासमोर सायकलची गर्दीशहरातील विविध ठिकाणी शिकवणी वर्गाचे पेव फूटले आहे. पार्किंगची कोणतीही व्यवस्था नसतानाही शिकवणी वर्ग सुरु आहेत. या ठिकाणी अल्पवयीन मुले-मुली आपल्या दुचाकी भर रस्त्यावर उभे करतात. त्यामुळे वातहुकीचा खोळंबा होतो. शिकवणी वर्ग सुटण्याच्या वेळी मोठा गोंधळ उडत होता. आधीच वाहन चालविणे येत नाही आणि त्यात गर्दी अशोवेळी अपघाताची भीतीही कायम आहे. मात्र सध्या शहरातील काही शिकवणी वर्गासमोरील दुचाकीची गर्दी ओसरली असून त्या ठिकाणी आता सायकली दिसू लागल्या आहेत.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी