शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या वाहनांमुळे प्रदूषणात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:20 IST

घुग्घुस : शहरात कोळसा खाणी, तसेच वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे यावर आळा घालणे गरजेचे आहे. विशेष ...

घुग्घुस : शहरात कोळसा खाणी, तसेच वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे यावर आळा घालणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, जुन्या वाहनांद्वारे मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याने प्रदूषण वाढले आहे.

बसअभावी प्रवाशांची गैरसोय

शंकरपूर : शंकरपूर- भिसी या मार्गाने एकही बस उपलब्ध नसल्याने बस सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. भिसी अपर तालुका असून, शासकीय कामासाठी येथे जावे लागत आहे, तसेच इतर कामांसाठीही नागरिकांना या रस्त्याने जाणे-येणे करावे लागतात. मात्र, बस नसल्याने प्रवाशांना खासगी वाहनाचा आधार घ्यावा लागतो.

बल्लारपूर-सिरोंचा रेल्वेमार्ग तयार करा

बल्लारपूर : येथून सिरोंचापर्यंत रेल्वेमार्ग तयार करण्यात यावा, अशी मागणी चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांतील नागरिकांकडून होत आहे. बल्लारपूर- सिंरोचा रेल्वेमार्ग तयार झाल्यास नागरिकांना सोयीचे होणार आहे.

मातीच्या ढिगाऱ्यावर झुडपे वाढली

गोवरी : राजुरा तालुक्यातील गोवरी, पोवनी, साखरी, सास्ती, गोयेगाव परिसरात वेकोलिने मातीचे महाकाय ढिगारे गावाच्या, शेताच्या लगत टाकले आहेत. या ढिगाऱ्यावर झुडपी जंगल निर्माण झाले असल्याने धोका होण्याची शक्यता आहे.

फाटकाजवळील कचरा हटवावा

गडचांदूर : येथील रेल्वे फाटकाजवळ असलेला कचरा डेपो बंद करावा, अशी नागरिकांची मागणी आहे. मागील काही दिवसांपासून येथे मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. पावसाळा असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे.

कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याची मागणी

मूल : तालुक्यातील बेंबाळ येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परिसरात राष्ट्रीयीकृत बँकेची एकच शाखा असल्याने येथे मोठी गर्दी असते. त्यामुळे रिक्त पदे त्वरित भरावीत, अशी मागणी आहे.

जीवनापूर येथील नाल्यांचा उपसा करण्याची मागणी

सावरगाव : नागभीड तालुक्यातील जीवनापूर येथील नाल्यांचा उपसा न झाल्याने त्या सांडपाण्याने तुंबल्या आहेत. काही भागांत नालीचे पाणी बाहेर वाहत असून, ते लोकांच्या घरात जात आहे. ग्रामपंचायतीने याकडे लक्ष देऊन नाल्यांचा उपसा करण्याची मागणी होत आहे.

फुटलेल्या घंटागाडीमुळे रस्त्यावर कचरा

चंद्रपूर : शहरात दररोज सकाळी घंटागाडीद्वारे कचरा संकलन केला जात आहे. मात्र, बहुतांश घंटागाड्या फुटलेल्या असल्याने रस्त्यावर कचरा पडत असतो.

पुलावर कठडे बसविण्याची मागणी

कोरपना : जिल्ह्यातील अनेक नद्या, तलाव येथील पुलावर कठडे नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात अनेक जण पडून मृत्युमुखी पडण्याच्या घटना घडत आहेत.

वढोलीत रस्त्याची दुरवस्था

वढोली : मध्यवर्ती बँक ते ऋषी पाल यांच्या घरापर्यंत जाणाऱ्या रस्त्याचे एकाच पावसामुळे तीनतेरा वाजले असून, नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गावात अनेक गल्ल्यांत काँक्रीट रस्ते झाले असून, गेल्या १० वर्षांपासून वाॅर्ड क्रमांक-२ मध्ये येणाऱ्या बँक ते ऋषी पाल यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता अजून मंजूर झाला नाही.

सौरऊर्जेचे कुंपण अनुदानावर द्यावे

चिमूर : शेतकऱ्यांच्या जमिनी जंगलाला लागून आहेत. वन्यप्राण्यांमुळे पिकांचे मोठे नुकसान होते. शेतकरी खरीप हंगामासाठी शेतीची मशागत करत आहेत.