शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईन खरेदीत वाढ, छोटे व्यावसायिक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 05:01 IST

इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या विक्रेत्यांवर संक्रांत आली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात सवलतींचा वर्षाव करून ग्राहकांना आकर्षित केले जात आहे. या कंपन्या ग्राहकांना घरपोच सेवा देतात. वस्तू घरपोच मिळत असल्याने ग्राहकांचाही त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहेत. त्यामुळे स्थानिक व्यावसायिक व विक्रेत्यांचे नुकसान होत आहे.

ठळक मुद्देसणासुदीचा फटका : ई-कॉमर्स कंपन्यांकडून सवलतींचा वर्षाव

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही वर्षांपासून ‘ऑनलाईन शॉपिंग’ या नव्या खरेदीच्या प्रकारामुळे बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात उलाढाल होत आहे. परिणामी प्रत्यक्षात दुकानात जाऊन खरेदी करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. मोठ-मोठ्या ई-कॉमर्स कंपन्यांची भारतात व्यवसाय सुरू केला आहे. त्यांच्याकडून दसरा, दिवाळीसह विविध सण व उत्सवानिमित्त ऑफर्स दिल्या जातात. या माध्यमातून कंपन्यांची कोट्यवधींची उलाढाल होत असल्याने छोट्या व्यावसायिकांना मोठा फटका बसत आहे.ऑनलाईन खरेदीकडे कल वाढत असल्याने कपड्यांचे विक्रेते, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या विक्रेत्यांवर संक्रांत आली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात सवलतींचा वर्षाव करून ग्राहकांना आकर्षित केले जात आहे. या कंपन्या ग्राहकांना घरपोच सेवा देतात. वस्तू घरपोच मिळत असल्याने ग्राहकांचाही त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहेत. त्यामुळे स्थानिक व्यावसायिक व विक्रेत्यांचे नुकसान होत आहे.विजयादशमीचा मुहूर्त साधत अशा कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात व्यवसाय केला होता. आता तर दिवाळीच्या शुभपर्वावर ग्राहकांना विविध प्रकारचे ऑफर देत असल्यामुळे स्थानिक व्यावसायिक चिंतेत पडल्याने दिसून येत आहे.कामगारांवर बेरोजगार होण्याची वेळअनेक कामगार एकाच दुकानात अथा एकाच व्यावायिकांकडे अनेक वर्षापासून नोकरी करतात. मालक आणि त्यांच्यात भावनिक नाते निर्माण झाल्याचेही बहुतांशवेळा दिसून येते. असे असले तरी अशा कामगारांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. व्यवसाय होत नसल्याने त्यांना कामावरुन कमी करण्यात येते. ऑनलाईन खरेदीचे प्रमाण वाढल्याने अशा व्यावसायिकांना फटका बसत आहे. त्यामुळे त्यांच्याकडून कामगार कपात केली जात आहे.ग्राहकांना घरपोच सेवाई-कॉमर्स कंपन्या त्यांच्या वेबसाईट तसेच अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून थेट ग्राहकापर्यंत पोहोचत आहेत. ऑनलाईन व्यवहार करणारे ग्राहक, स्मार्ट फोनचे वापरकर्ते या कंपन्यांसाठी ग्राहक आहेत.व्यावसायिकांत चिंतेचे वातावरणऑनलाईन व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांनी मोठ्या डील्स, फेस्टिव्हल ऑफर्सद्वारे ग्राहकांना आकर्षित केले आहे. कोणताही सण-उत्सव आला की बड्या कंपन्यांतर्फे फेस्टिव्हल ऑफर जाहीर केली जाते. आकर्षक सूट मिळत असल्याने बहुतांश ग्राहकांचा कल ऑनलाईन खरेदीकडे आहे. दिवाळीतही ऑफर्स देण्याची शक्यता असल्याने स्थानिक व्यावसायिक धास्तावले आहेत. दसरा व दिवाळीत दरवर्षी होणारी उलाढाल कमी होत आहे. त्यामुळे त्यांच्याकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Shoppingखरेदी