शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
6
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
7
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
8
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
9
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
10
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
11
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
12
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
13
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
14
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
15
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
16
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
17
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
18
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
19
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
20
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
Daily Top 2Weekly Top 5

जवखेडे हत्याकांडातील आरोपींना तत्काळ अटक करा

By admin | Updated: November 6, 2014 01:20 IST

संपूर्ण मानवजातीला कलंकीत करणाऱ्या व पुरोगामी महाराष्ट्रातील शरमेने मान खाली घालावयास लावणाऱ्या २० आॅक्टोबरला घडलेल्या...

चंद्रपूर : संपूर्ण मानवजातीला कलंकीत करणाऱ्या व पुरोगामी महाराष्ट्रातील शरमेने मान खाली घालावयास लावणाऱ्या २० आॅक्टोबरला घडलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडे गावातील जाधव परिवारातील तिहेरी हत्याकांडातील आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी भारिप बहुजन महासंघाने एका लेखी निवेदनाद्वारे येथील जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांनी केली आहे.दलित हत्याकांडाला घेऊनच भाजप सरकारचा राज्यात उदय झाला आहे. एकीकडे गोरक्षण कायद्याची मागणी करणारे, गायीला माता माणून तिची पूजा करणारे, गाईची हत्या करू नये, अशी मागणी करणारे, जिवंत माणसाची खुलेआम कत्तल करून काय संदेश देवू पहात आहे? असा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो.गेली १४-१५ दिवस लोटूनही येथील पोलीस प्रशासन आरोपीचा शोध घेवू शकत नाही. त्यामुळे आरोपींना पोलिसाद्वारे अभय देण्याचा तर प्रयत्न नाही ना? अशी शंका भारिप बहुजन महासंघाने व्यक्त केली आहे. एकीकडे अ‍ॅक्ट्रासिटी दाखल करायची तर दुसरीकडे आरोपीचे नाव माहित नाही. साधा त्याचा चेहरा माहीत नाही, असे सांगितले जात आहे. यामागे नेमकी पोलिसांची भूमिका काय? असा प्रश्नही निर्माण होत आहे. सदर घटनेतील सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी, घटनेची सीबीआय चौकशी करावी, दलित अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यात यावी, नगर जिल्ह्यातील पोलीस अधिक्षकांना जबाबदार धरून त्यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे आदि मागण्या करण्यात आल्या.निवेदन देताना जिल्हाध्यक्ष कुशल मेश्राम, पी.व्ही. मेश्राम, सुरेश नारनवरे, रूपचंद निमगडे, राजूभाऊ किर्तक, मधुभाऊ वानखेडे, रुचा लोणारे, शालू कांबळे, विवेक पेटकर उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)