शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

आसापूर शिवारात अवैध गौण उत्खनन

By admin | Updated: December 22, 2015 01:06 IST

तालुका तहसील कार्यालयापासून अवघ्या चार कि.मी. अंतरावर आसापूर शेतशिवाराला लागूनच गिट्टीचे अवैध

जिवती : तालुका तहसील कार्यालयापासून अवघ्या चार कि.मी. अंतरावर आसापूर शेतशिवाराला लागूनच गिट्टीचे अवैध उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू आहे. भरदिवसा उत्खनन करून त्याची वाहनांनी वाहतूक होत असते. पण महसूल अधिकारी, वनविभागाचे कर्मचारी याकडे हेतुपुरस्सर कानाडोळा करत असल्याचे चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे, सदर गिट्टी व दगडाचे उत्खनन ज्याठिकाणी सुरू आहे, ते ठिकाण रस्त्याच्या कडेलाच पंधरा ते वीस मीटर अंतरावर लागून आहे. याच रस्त्यावरुन महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी दररोज तहसील कार्यालयात ये-जा करतात. पण त्यांना हा अवैधरित्या चालत असलेला प्रकार कधीच दिसला नाही.जिवती तालुक्यात कुठेही गौण उत्खननासाठी परवाना मिळणार नाही, असे सक्त आदेश असताना तसेच वनविभाग आणि महसूल विभागाची नेमकी जागा कोणती हे निश्चित होणार नाही तोपर्यंत परवाना मिळणार नाही, असे शासकीय निर्देश आहेत. असे असताना तालुक्यात सर्रासपणे अवैध उत्खनन सुरू कसे, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे सहाजिकच अधिकाऱ्यांकडे अंगुलीनिर्देश केले जात आहे. विनापरवान्याने गाड्या भरुन जातात, शासनाचा महसूल बुडतो, हा गंभीर प्रकार असतानाही यासंदर्भात कारवाई मात्र शुन्य आहे.नगराळा तलाठी साजा अंतर्गत आसापूर शेतशिवाराला लागून हे अवैध उत्खनन गेल्या वर्षभरापासून सुरू असून उत्खननामुळे याठिकाणी मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत. प्रस्तूत प्रतिनिधीने याठिकाणी भेट दिली असता हे उत्खनन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या अगदी मागच्या बाजूला सुरू असल्याचे दिसून आले. शाळेच्या जवळच मोठमोठे खड्डे पडल्याने भविष्यात हे खड्डे विद्यार्थ्यांसाठी धोक्याचे ठरू शकतात, अशा प्रतिक्रिया या शाळेच्या शिक्षकांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केल्या आहेत. केवळ याच ठिकाणी नाही तर हा प्रकार संपूर्ण तालुक्यात अनेक ठिकाणी सुरू आहे. वनविभागाच्या जागेतूनही हा प्रकार होत असताना त्यांच्याकडूनही दुर्लक्ष केले जात आहे. तालुक्याच्या विकासाची भाषा करणारे महसूल अधिकारी बंदी असलेल्या परिसरातच अवैध उत्खनन कसे काय होऊ देतात, हा प्रश्न त्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा आहे. यात शासनाचाही लाखोंचा महसूल बुडत आहे. याकडे लक्ष द्यावे. (शहर प्रतिनिधी)विद्यार्थ्यांसाठी खड्डे धोकादायकजिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आसापूरच्या इमारतीच्या मागे व बाजूला हे अवैध गिट्टीचे उत्खनन सुरू आहे. या उत्खननामुळे याठिकाणी मोठमोठे खड्डे तयार झाले असून या खड्डयात पावसाळ्यात पाणी साचू शकते. परिणामी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी धोका उद्भवू शकतो, हे नाकारता येण्यासारखे नाही.