शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

अवैध दारूविक्रेतेच घडवू शकतात मालवणीची पुनरावृत्ती

By admin | Updated: June 25, 2015 01:15 IST

विषारी दारुमुळे मुंबईच्या मालवणी येथील १०२ नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे.

चंद्रपूर : विषारी दारुमुळे मुंबईच्या मालवणी येथील १०२ नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे. राज्य सरकारने सकारात्मक दृष्टिकोन ठेवून चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी केली. परंतु, अवैध दारुविक्रेत्यांकडून विषारी दारुची विक्री करून चंद्रपुरातही मालवणीच्या घटनेची पुनरावृत्ती होऊ शकते, अशी भीती वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज दारुमुक्ती अभियानाच्या संयोजिका अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांनी व्यक्त केली.मुंबईच्या मालवणी येथील १०२ नागरिकांचा विषारी दारु प्राशन केल्याने मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून, संपूर्ण राज्यात दारुबंदी करण्याची मागणी होत आहे. महिलांच्या आंदोलनाची दखल घेऊन राज्य शासनाने चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी लागू केली. दारुबंदी लागू करण्यापूर्वी आणि प्रत्यक्षात अंमलात आल्यानंतर शासनाने बंदी मागे घ्यावी, यासाठी चंद्रपूर जिल्हा दारु असोसिएशनचे सल्लागार आणि त्या व्यवसायातील त्यांच्या साथीदारांनी जोरदार प्रयत्न करीत आहेत.मात्र, न्यायालयात आणि शासनदरबारी त्यांना अपयश आले. जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत बनावट दारु दाखविली होती. तसेच अशाप्रकारच्या दारुचा पुरवठा होत असल्याची माहिती दिली. त्यामुळे जिल्ह्यात पुरवठा होणाऱ्या बनावट दारुमुळे नागरिकांना मृत्यू होण्याची शक्यता असल्याचे कारण देत दारुबंदी हटविण्याची मागणी त्यांनी केली होती.आता मालवणीच्या घटनेनंतर येथील दारुविक्रेते चंद्रपुरातही विषारी दारुचा पुरवठा करुन नागरिकांच्या जिवाशी खेळू शकतात. यात एखाद्याच्या मृत्यूनंतर ते शासनाने बंदी उठविण्याबाबत मागणी करु शकतात, असेही गोस्वामी यांनी निवेदनात म्हटले आहे. वर्धा, गडचिरोली जिल्ह्यात दारू बंदी काळात विषारी दारुमुळे मृत्यू झाल्याची अजूनपर्यंत एकही घटना घडली नाही. परंतु, चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध दारुविक्रेते बनावट दारुमुळे नागरिकांचा जीव जाण्याची भीती व्यक्त करीत आहेत. हा प्रकार गंभीर आहे. यासाठी भविष्यात दारु विक्रेते मोठे षडयंत्र घडवू शकतात. त्यामुळे पोलीस विभागाने याचे गांभीर्य लक्षाय घेता दारूची विक्री होणार नाही, याची खबरदारी घ्यावी असे गोस्वामी यांनी म्हटले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)