शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

चंदनखेड्यातील फळवाटिकेकडे दुर्लक्ष

By admin | Updated: June 25, 2015 01:24 IST

शासनाच्या विविध योजना अंतर्गत पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण कार्यक्रम जोरात हाती घेण्यात येत आहे.

चंदनखेडा: शासनाच्या विविध योजना अंतर्गत पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण कार्यक्रम जोरात हाती घेण्यात येत आहे. परंतु यापूर्वी रोपवन केलेल्या लिंबाच्या फळवाटिकाकडे ग्रामपंचयतीचे पूर्णत: दुर्लक्ष असून ही फळवाटिका लोकासाठी शौचालयाकरिता मोकळे रान ठरली आहे.अनेक वर्षापूर्वी सामाजिक वनीकरण अंतर्गत जि.प. शाळा परिसरात असलेल्या जमिनीवर ग्रामपंचायतीमार्फत लिंबाच्या झाडाचे रोपण करुन फळवाटिका तयार करण्यात आली व काही वर्षातच या झाडापासून ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळावे, यासाठी वार्षिक लिलाव करुन त्यापासून येणारे उत्पन्न ग्रामपंचायतीमध्ये जमा करण्यात येत होते. परंतु वृक्षारोपणासंदर्भात शासनाच्या विविध नवीन योजना व भरपूर निधी येत गेल्याने या फळवाटिकेकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत गेले. सदर झाडांना कुठलेही कुंपन व नियंत्रण नसल्याने ही फळवाटिका शौचालयास बाहेर जात असलेल्या व्यक्तीसाठी जणू संरक्षित जागाच झाल्याचे दिसून येत आहे.एकीकडे पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना असो की रोजगार हमी योजना असो, कुठल्या ना कुठल्या योजनेच्या माध्यमातून लाखो रुपयांचे वृक्षारोपण तथा जतन कार्यक्रम कृषी विभाग, ग्रामपंचायत तसेच वनविभागाच्या देखरेखीखाली सुरु आहे. झाडाच्या संगोपनात तनकचरा सफाई, संरक्षण कठडे तसेच उन्हाळ्यात दूरवरुन पाणी आणून पाण्याची व्यवस्था मजुराद्वारा केली जाते. असे असताना काही व्यक्तीकडून शेतशिवारात धुरे पेटविण्यासाठी वनवा लावला जातो. परंतु निष्काळजीपणामुळे आगीवर नियंत्रण करु न शकल्याने शेतालगत रोपन केलेल्या वृक्षाना या आगीत भस्म व्हावे लागत आहे. यात लाखो रुपये पाण्यात जात आहे. दुसरीकडे अस्तित्वात असलेल्या फळवाटिकेकडे दुर्लक्ष केले जाते. हा विरोधाभास कधी संपणार, यात कधी बदल होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (वार्ताहर)