"मी सर्व काही गमावले.. मला इच्छामरणाची परवानगी द्या' किडनी विकणाऱ्या शेतकऱ्यावर मरणाची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 13:31 IST2026-04-04T13:28:23+5:302026-04-04T13:31:28+5:30

Chandrapur : अवैध सावकारांच्या जाचापोटी स्वतःची किडनी विकणारा मिंथूर येथील शेतकरी रोशन शिवदास कुळे याने आता इच्छा मरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी शासनाकडे केली आहे.

"I lost everything.. allow me to euthanize" Time to die for farmer who sold kidney | "मी सर्व काही गमावले.. मला इच्छामरणाची परवानगी द्या' किडनी विकणाऱ्या शेतकऱ्यावर मरणाची वेळ

"I lost everything.. allow me to euthanize" Time to die for farmer who sold kidney

लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड (चंद्रपूर) :
अवैध सावकारांच्या जाचापोटी स्वतःची किडनी विकणारा मिंथूर येथील शेतकरी रोशन शिवदास कुळे याने आता इच्छा मरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी शासनाकडे केली आहे. तसे पत्र त्याने जिल्हाधिकारी यांना दिल्यामुळे खळबळ उडाली आहे.

रोशन कुळेने गावातल्या सावकाराकडून एक लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जाच्या परतफेडीपोटी त्याने तब्बल ७४ लाख रुपये सावकारांना मोजून दिले. मात्र, तरीही कर्ज फिटले नाही. सावकारांच्या विळख्यातून सुटण्यासाठी अखेर रोशन कुळेने स्वतःची एक किडनी विकली. ही बाब उघडकीस आल्यानंतर या किडनी प्रकरणाचे धागेदोरे विदेशासह देशभर पसरल्याचे पुढे आले. सुरुवातीला पोलिसांनी सावकारी प्रकरणातील आरोपी किशोर रामभाऊ बावनकुळे, लक्ष्मण पुंडलिक उरकुडे, प्रदीप रामभाऊ बावनकुळे, संजय विठोबा बल्लारपुरे, मनीष पुरुषोत्तम घाटबांधे आणि सत्यवान रामरतन बोरकर यांना तातडीने अटक केली होती.

ही घटना उघडकीस येऊन आता साडेतीन महिन्यांचा कालावधी झाला आहे. दरम्यानच्या काळात रोशन कुळेला न्याय मिळवून देण्यासाठी मोठे आंदोलनही झाले. एवढेच नाही तर पालकमंत्री, आमदार व सर्व प्रशासकीय यंत्रणेने रोशन कुळेच्या घरी भेट देऊन त्वरित न्याय मिळवून देण्याचे जाहीर केले होते.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात या मुद्द्यांवर चर्चाही झाली होती. सावकारांची सर्व मालमत्ता सील करण्यात येईल. तसेच रोशन कुळेला भरपाई दिली जाईल, असेही वेळोवेळी सांगण्यात आले होते. मात्र, रोशन कुळे आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. या प्रकाराला कंटाळून आता त्याने जिल्हाधिकारी यांना पत्र लिहून इच्छा मरणाची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

"मी सर्व काही गमावले आहे. अतिशय हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत आहे. माझे वडील अपंग आहेत. मला मदतीची गरज आहे. नाहीतर मला इच्छा मरणाची परवानगी देण्यात यावी."
- रोशन शिवदास कुळे, पीडित शेतकरी मिथूर

Web Title : कर्ज में डूबे किसान ने किडनी बेचकर सब कुछ खो दिया, इच्छामृत्यु की गुहार।

Web Summary : कर्ज से त्रस्त किसान रोशन कुले, जिन्होंने अपनी किडनी बेच दी, इच्छामृत्यु की गुहार लगा रहे हैं। मदद और संपत्ति जब्त करने के वादों के बावजूद, न्याय मायावी बना हुआ है, जिससे वह इस हताश उपाय के लिए मजबूर हो गए हैं।

Web Title : Debt-ridden farmer seeks euthanasia after losing everything, selling kidney.

Web Summary : Facing relentless debt, farmer Roshan Kule, who sold his kidney, pleads for euthanasia. Despite promises of help and property seizures, justice remains elusive, driving him to this desperate measure.