शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक; गोलंदाजीत अकिल होसीन इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

बांबू कटाई कामगारांवर उपासमारीची पाळी

By admin | Updated: March 2, 2015 01:09 IST

वनप्रकल्प विभाग मध्य चांदा बल्लारपूरअंतर्गत येणाऱ्या वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय तोहोगाव क्षेत्रात गेल्या तीन महिन्यांपासून बांबू कटाईचे काम करणाऱ्या परप्रांतीय कामगारांना वेतन देण्यात आले नाही.

गोंडपिपरी : वनप्रकल्प विभाग मध्य चांदा बल्लारपूरअंतर्गत येणाऱ्या वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय तोहोगाव क्षेत्रात गेल्या तीन महिन्यांपासून बांबू कटाईचे काम करणाऱ्या परप्रांतीय कामगारांना वेतन देण्यात आले नाही. परिणामी या कामगारांच्या कुटुंबावर उपासमारीचे संकट ओढावले आहे. बँकेत पैसे जमा न झाल्याचे कारण पुढे करून अधिकारी व कर्मचारी वेळ मारून नेत असल्याने शेकडो कामगारांनी चक्क तोहोगाव वनपरिक्षेत्र कार्यालय परिसरात गेल्या १२ ते १५ दिवसांपासून ठिय्या मांडला आहे. ठिय्या मांडणाऱ्या कामगारांना उघड्यावर संसार थाटावा लागला असुन पहाटेची थंडी, दुपारची उन सोसत पोटाची खळगी भरण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अधिकारी मात्र ‘मिटींग’चे कारण पुढे करून गैरहजर रहात असल्याची व्यथा अन्यायग्रस्त कामगारांनी ‘लोकमत’शी बोलताना मांडली.महाराष्ट्र राज्याला लागून असलेल्या मध्यप्रदेश राज्यातील बालाघाट मंडला यासह गोंदिया या जिल्ह्यातून शेकडो कामगार रोजगाराच्या शोधात बांबु कटाईचे काम करण्याकरिता तालुक्यातील तोहोगाव वनविकास महामंडळाच्या वनपरिक्षेत्रात दाखल झाले. डिसेंबर २०१४ पूर्वीपासून सदर वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक ४९, ३६, २५, २४, ३७ बांबू कटाईचे काम जोमात सुरू आहे. यामुळे परप्रांतातून दाखल झालेल्या कामगारांनी या क्षेत्रामध्ये दिवसरात्रं घाम गाळून कुटुंबासह बांबू कटाईचे काम पूर्ण केले. याच दरम्यान बँकेत पैसे जमा झाले नसल्याचे कारण पुढे करित वनपरिक्षेत्र अधिकारी यू.बी. गुडपल्ले यांनी कामगारांच्या मागणीनुसार कामानुरूप मोबदला न देता केवळ आठवडी बाजाराच्या दिवशी सप्ताह वेतनाच्या नावावर दीडशे ते दोनशे रुपये देण्याचे आश्वासन देऊन बांबु कटाईचे काम सुरूच ठेवण्याचे आदेश दिले. कामगारांकडून कामे करून घेणाऱ्या वनरक्षक सीमा आत्राम, वनमजुर बंडू खामणकर, वनरक्षक सतीश दवणे यांनीही कामगारांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून पैसे देण्याची वेळ येताच टाळाटाळ केल्याचे कामगारांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. याच आठवड्यात होळी सण येत आहे. बांबु कटाई कामगार कामे आटपून सण उत्सवाकरिता गावी परत जाण्याच्या तयारीत असताना अधिकारी गुडपल्ले व कामे करून घेणारे वनरक्षक व वनमजूर यांनी कामगारांपुढे येण्याचे टाळले. त्यामुळे शेकडो कामगारांनी वेतनाकरिता वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय तोहोगाव परिसरातच कुटुंबासह मुक्काम ठोकला आहे. उसणवारीच्या पैशातून व उधारीतून धान्य खरेदी करून हे कामगार पोटाची खळगी भरत असल्याचे विदारक चित्र परिसरात दिसून आले. तळ ठोकणाऱ्या कामगारांमध्ये महिलांसह छोटी बालके व बालकांचा समावेश आहे. गत दीड ते दोन महिन्यापूर्वी ३०० हून अधिक कामगारांना हिवतापासारख्या आजारालाही सामोरे जावे लागल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्रातून मिळाली. वनविकास महामंडळाकडे या शेकडो कामगारांचे लाखो रुपयांचे वेतन थकीत आहे. यासंदर्भात प्रस्तुत प्रतिनिधी वनपरिक्षेत्र अधिकारी यू.बी. गुडपल्ले यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता, मिटींग सुरू असल्याचे कारण सांगून संपर्क तोडला. (तालुका प्रतिनिधी)