शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

बांबू कामगारांवर उपासमारीचे संकट

By admin | Updated: January 6, 2017 01:15 IST

सिंदेवाही तालुक्यातील शिवनी-वासेरा वनपरिक्षेत्र शिवनी आणि संपूर्ण सिंदेवाही तालुक्यातील सर्व बांबू कामगार वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची अरेरावी आणि अनागोंदी,

स्वामित्व शुल्क : सूट देण्याची मागणी सिंदेवाही : सिंदेवाही तालुक्यातील शिवनी-वासेरा वनपरिक्षेत्र शिवनी आणि संपूर्ण सिंदेवाही तालुक्यातील सर्व बांबू कामगार वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची अरेरावी आणि अनागोंदी, मनमानी कारभाराने त्रस्त झाले आहेत. या क्षेत्रातील बांबुवर आधारित कार्यकुशलतेवर कुटुंबांच्या उदरनिर्वाहाची सोय करीत असलेल्या या कामगारांवर उपासमारीचे सावट आले आहे. महाराष्ट्र शासनद्वारे निर्गमित ५ डिसेंबर २०१४ रोजीच्या पत्रानुसार नोंदणीकृत बांबू कामगारांना १ हजार ५०० बांबुचा पुरवठा निस्तार दरावर करावा, असा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या शासन निर्णयानुसार ७ हजार ९०० बुरूडांना बांबू व्यवसाय करण्याचा परवाना प्राप्त आहे. त्यामध्ये सर्व जिल्हा परिषद सर्कलनिहाय सिंदेवाही तालुक्यात वनपरिक्षेत्रातील सर्व मजुरांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. परंतु या विभागातील वनपरिक्षेत्र अधिकारी २०१४च्या शासन निर्णयाला मानीत नाही, अशा तोऱ्यात वागत आहेत. तसेच त्याची पुनरावृत्ती संपूर्ण तालुक्यात वन विभागातर्फे होताना दिसत आहे. आजघडीला जिल्हा परिषद क्षेत्र मोहाळी-वासेरा, गुंजेवाही-लोनवाही, पळसगाव-नवरगाव, रत्नापूर-शिवणी या चारही जिल्हा परिषद क्षेत्रात समाविष्ठ असलेल्या प्रत्येक गावातील परिसरातील संपूर्ण बांबू कामगाराच्या परिवारावर उपासमारीचे सावट पसरले आहे. करिता तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष अरुण कोलते यांच्या नेतृत्वात अरविंद जैस्वाल, वीरेंद्र जैस्वाल, रमाकांत लोधे, हरिभाऊ बारेकर, सीमा सहारे, लता सुरपाम आदीनी निवेदन दिले. (शहर प्रतिनिधी)