शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील शेकडो जनावरे कत्तलखान्याकडे

By admin | Updated: December 21, 2015 00:54 IST

यंदाचे दुष्काळी वातावरण, त्यामुळे बिकट झालेली आर्थिक परिस्थिती आणि त्यातून अनेक पशुपालक आपले पशुधन..

शेतकऱ्यांची लूट : तस्करांनी धरलीय कोरपन्याची वाटचंद्रपूर: यंदाचे दुष्काळी वातावरण, त्यामुळे बिकट झालेली आर्थिक परिस्थिती आणि त्यातून अनेक पशुपालक आपले पशुधन कवडीमोल भावात विकत असून जिल्ह्यातील ही जनावरे कोरपनामार्गे आदिलाबादकडे कत्तलखान्यात नेली जात असल्याची माहिती आहे. काही तस्कर कोरपना येथून वणी मार्गे नागपूरकडे ही जनावरे घेऊन जात असल्याचे बोलले जात आहे. गोहत्याबंदी कायदा लागू झाला असला तरी धडधाकट पाळीव जनावरेदेखील कत्तलीसाठी नेली जात असल्याची माहिती आहे. यंदा जिल्ह्यात अतिशय अल्पपाऊस झाला. त्याचा परिणाम शेती उत्पादनावर झाला आहे. शेतकऱ्यांच्या हाती सरासरी ७० टक्के उत्पादन आले. त्यातच शेतमालाला अल्पभाव मिळत असल्याने शेतीवर झालेला खर्चही त्यातून निघत नाही. त्यामुळे आलेल्या हतबलतेतून शेतकरी अल्प किंमतीत आपली जनावरे कसायांच्या हवाली करीत असल्याचे चित्र आहे. कोरपना तालुका हा तेलंगाणा व यवतमाळ जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर आहे. त्यातच हा भाग अतिदुर्गम असल्याने या भागावर कुणाचेही लक्ष जात नाही. याचाच फायदा घेऊन जनावरांचे तस्कर या भागात सक्रीय झाले आहेत. गरजवंत शेतकऱ्यांना हेरायचे आणि अतिशय अल्प किंमतीत त्यांच्याजवळील जनावरे खरेदी करायची असा हा गोरखधंदा राजरोस सुरू आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी भरणाऱ्या बैलबाजारातही हे तस्कर सक्रीय असून गरजू शेतकऱ्यांना लुबाडण्याचे काम हे तस्कर करीत आहेत. यातून पशुपालक शेतकरी नागवला जात आहे. या तस्करांवर पोलिसांची नजर असली तरी अतिशय चतुराईने पोलिसांच्या डोळ्यात धूळ झोकून जनावरांची तस्करी करीत आहेत. (प्रतिनिधी)