बल्लारपुरात बाप्पाची मूर्ती खरेदीसाठी प्रचंड गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:28 IST2021-09-11T04:28:03+5:302021-09-11T04:28:03+5:30
बल्लारपूर : लोकांनी सुरक्षित वावर पाळावा, अशा सूचना दिल्या असताना शहरातील वस्ती विभागात बाप्पांना घरी नेण्यासाठी गणेश भक्तांनी सकाळपासून ...

बल्लारपुरात बाप्पाची मूर्ती खरेदीसाठी प्रचंड गर्दी
बल्लारपूर : लोकांनी सुरक्षित वावर पाळावा, अशा सूचना दिल्या असताना शहरातील वस्ती विभागात बाप्पांना घरी नेण्यासाठी गणेश भक्तांनी सकाळपासून प्रचंड गर्दी केली होती. श्री गणेशजींच्या मूर्तींनी बाजार गजबजलेला होता. ही गर्दी घरोघरी गणेश स्थापना करणाऱ्यांची होती.
कोरोनाचे संकट अद्याप टळले नसल्यामुळे यंदा सार्वजनिक गणेश मंडळाचा उत्साह कमी दिसत आहे. शहरात ३५ तर ग्रामीणमध्ये १५ गणेश मंडळांनी पोलिसांना परवानगी मागितली आहे, तसेच पाच गावात एक गाव एक गणपती उत्सव साजरा होणार आहे.
बॉक्स
१० कृत्रिम तलाव
यंदा वर्धा नदीमध्ये विसर्जनास बंदी असल्याने नगरपालिकेने यावेळेस शहरात गणपती घाट, गांधी पुतळा, वेकोलि गेट, साईबाबा वॉर्ड, गोरक्षण वॉर्ड, टेकडी विभाग नाट्यगृह, विवेकानंद वॉर्ड, मंगल कार्यालयाजवळ असे १० ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था केली आहे. शनिवारपासून दीड दिवसाच्या गणेशाच्या विसर्जनाला सुरुवात होणार आहे. शहरातील नागरिकांनी कोरोना नियमाचे पालन करून कृत्रिम तलावामध्ये विसर्जन करावे, असे आवाहन नगर परिषदतर्फे करण्यात आले आहे.
100921\20210910_124027.jpg
बाजारात गणेश मुर्ती