शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
3
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
4
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
5
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; सेन्सेक्स ३४४ तर निफ्टीमध्ये ६६ अंकांची वाढ; 'हे' शेअर्स सुस्साट
6
'राजा शिवाजी'मध्ये शिवरायांच्या सासूच्या भूमिकेत दिसली 'ही' अभिनेत्री, पोस्ट शेअर करत म्हणाली...
7
Election Results 2026: केरळमध्ये काँग्रेस सुसाट, भाजपाचीही सात जागांवर आघाडी
8
अंगारक संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, WhatsApp Status शेअर करून बाप्पाचे आशीर्वाद सर्वांपर्यंत पोहोचवा
9
West Bengal Assembly Election: पश्चिम बंगालमध्ये निकालाच्या आदल्या रात्री काळेबेरे? ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ पोस्टनं खळबळ!
10
Baramati Rahuri Results 2026: बारामतीत अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा पवार यांना आघाडी, तर राहुरीचा कल काय? आहे अशी अपडेट
11
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
12
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
13
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
14
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
15
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
16
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
17
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
18
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
19
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
20
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मानव विकासच्या मोफ त पाससाठी विद्यार्थिनींचे साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:33 IST

मुलीचे शिक्षणाचे प्रमाण वाढावे, याकरिता शासनाने इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थिनिना मानव विकास मिशनअंतर्गत मोफत पास योजना सुरू केली आहे.

मोफत पासची व्यवस्था करावी : आगार व्यवस्थापकाकडे मागणीलोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : मुलीचे शिक्षणाचे प्रमाण वाढावे, याकरिता शासनाने इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थिनिना मानव विकास मिशनअंतर्गत मोफत पास योजना सुरू केली आहे. मात्र पळसगाव हे गाव मानव विकास अंतर्गत येत नसल्याचा कारणाने विद्यार्थिनींना मोफ त पास देण्यात येत नाही. त्यामुळे आम्हाला मोफत पास द्यावा, याकरिता पाळसगाव येथील २५ विद्यार्थिंनीनी जि.प. सदस्य गजानन बुटके यांच्या नेतृत्वात आगार व्यवस्थापक आशीष मेश्राम यांना साकळे घातले.मुलगी शिकली तर पूर्ण घर शिकते. मात्र ग्रामीण भागात मुलींचे शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. या करिता शिक्षणाच्या सोई आर्थिक परिस्थिती असे अनेक कारणे आहेत. त्यामुळे शासनाने ईयत्ता अकावी- बारावीच्या विद्यार्थिनींना मानव विकास मिशनअंतर्गत मोफत पास योजना सुरू केली. मात्र चिमूर तालुक्यातील पळसगाव येथील विद्यार्थीनी वासेरा-शिवनी येथे अकरावी-बारावी वर्गात शिक्षणासाठी जातात. गावाचा समावेश मानव मिशन मध्ये येत नसल्याने या गावातील विद्यार्थिनीना मोफ त पास देण्यात येत नाही. त्यामुळे या गावातील अनेक मुली शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.आपण शिक्षणापासून वंचित राहू नये, व आपल्याला मानव विकासच्या मोफ त पास मिळावा, याकरिता मासळ-मदनापूर जिल्हा परिषद क्षेत्राचे सदस्य गजानन बुटके यांना निवेदन देवून आगार व्यवस्थापक आशीष मेश्राम यांना चक्क २५ विद्यार्थिनीनी आगार प्रमुखाचे कार्यालयासमोर मोफत पाससाठी साकडे घातले. साकडे घालणाऱ्या विद्यार्थिनीमध्ये निकीता बन्सोड, शकिला गुडघे, शिल्पा सोनवाने, योगिता मांदाडे, श्वेता रामटेके, उर्मीला महाडोरे, अकिंता मेश्राम, स्नेहा रामटेके, अंजु शहा यासहन अनेक विद्यार्थिनीचा समावेश होता.मानव विकास योजनेत २६ गावांचा समावेशचंद्रपूर जिल्हा आदिवासी बहुल असल्याने या जिल्यातील चिमूर तालुक्याचा समावेश मानव विकास मिशनमध्ये आहे. या तालुक्यातील २६ गावांचा समावेश शिक्षणाकरिता मानव विकास मिशनमध्ये आहे. मात्र उर्वरीत गावांचा समावेश नसल्यामुळे त्या गावातील मुलींना योजनेचा लाभ घेत येत नाही. त्यामुळे सदर योजनेपासून विद्यार्थिंनी वंचित असल्याचे चित्र दिसून येत आहे. चिमूर तालुकयातील ७ बस या मानव विकास मिशन योजनेसाठी देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये संवर्ग विकास अधिकारी गट शिक्षणाधिकारी यानी ठरवून दिलेल्या मागणीतील विद्यार्थानाच मानव विकासचा मोफत पास देता येतो. पळसगाव-वासेरा हा मार्ग मानव विकास अंतर्गत येत नाही. त्यामुळे या गावातील विद्यार्थिंनींना मोफ त पासचा योजनेचा लाभ देता येत नाही. ज्या गावांचा समावेश असेल त्यांनाच लाभ देता येतो.- आशीष मेश्रामआगार व्यवस्थापक, चिमूर