शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

सरपंच, उपसरपंचांना मानधन, सदस्यांना केवळ चहापान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:33 IST

चंद्रपूर : ग्रामपंचायतीचे कामकाज पाहून गाव चालविणाऱ्या सरपंच आणि उपसरपंचांना लोकसंख्येच्या आधारावर मानधन दिले जाते. हे मानधन सदस्यांना मात्र ...

चंद्रपूर : ग्रामपंचायतीचे कामकाज पाहून गाव चालविणाऱ्या सरपंच आणि उपसरपंचांना लोकसंख्येच्या आधारावर मानधन दिले जाते. हे मानधन सदस्यांना मात्र मिळत नाही. त्यामुळे सरपंच, उपसरपंचांना असलेले मानधन वाढवून इतर सदस्यांनाही काही प्रमाणात मानधन द्यावे, अशी मागणी आता सदस्यांकडून केली जात आहे. विशेष म्हणजे, इतर सदस्यांना केवळ बैठक भत्ता देऊन मोकळे केले जात आहे.

ग्रामपंचायत सदस्यांना पूर्वी बैठक भत्ता केवळ २५ रुपये मिळत होता. आता त्यात वाढ करण्यात आली आहे. मात्र मानधन नसल्याने सदस्यांना बैठक भत्ता आणि चहापानावरच समाधान मानावे लागते. महागाई सातत्याने वाढत आहे. त्यामुळे सरपंचांचे मानधन वाढवून इतर सदस्यांनाही त्याचा लाभ देण्याची मागणी आता होऊ लागली आहे.सरपंचाना ७५ टक्के मानधन तरतुदीमधून दिले जाते तर २५ टक्के रक्कम ग्रामपंचायतीचे उत्पन्नातून दिले जाते. मात्र ग्रामपंचायतीचे उत्पन्न कमी राहत असल्याने त्यांना मानधन मिळण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे शासनाने थेट सरपंच सदस्यांना मानधन देणे गरजेचे आहे.

मानधन

३०००० ते ५०००

लोकसंख्यानिहाय ग्रामपंचायती सरपंच मानधन उपसरपंच मानधन

० ते २००० ३०००रु. १००० रु.

२००१ ते ८००० ४००० रु. १५०० रु.

८ हजारांहून जास्त ५०००रु. २००० रु.

--

निवडून आलेल्या सदस्यांना २०० ते ३०० रुपये बैठक भत्ता आणि चहापाणी एवढ्यावरच समाधान मानावे लागते.

--

६२९

निवडणुका झालेल्या ग्रामपंचायती

४१९१

निवडून आलेले सदस्य

८२४

सरपंच

---

कोट

सरपंच काय म्हणतात...

सरपंचांना किमान दहा हजार तसेच उपसरपंच तसेच इतर सदस्यांनाही दरमहा मानधन देण्याची तरतूद करावी. सध्या सरपंच, उपसरपंचांना लोकसंख्या तसेच निधीच्या उपलब्धतेनुसार मानधन दिल्या जाते. त्यामुळे कुठे कमी तर कुठे जास्त असा भेदभाव होतो. त्यामुळे सरपंचाना दहा हजार तसेच इतर सदस्यांनाही मानधन जाहीर करावे.

-पारस पिंपळकर

जिल्हा संपर्क प्रमुख,

अखिल भारतीय सरपंच संघटना,चंद्रपूर

----

कोट

गावात विकासाची कामे करताना सर्वांचाच विचार करावा लागतो. सरपंच, उपसरपंचांना मानधन दिल्या जाते. मात्र सदस्यांना वंचित ठेवल्या जाते. त्यांनाही शासनाने मानधन दिले पाहिजे.

-शर्मिला रामटेके

सरंच, नवेगाव पांडव

---

कोट

सदस्यांना सभेच्या दिवसाचा भत्ता दिला जातो. त्यामुळे सरपंच, उपसरपंचासह इतर सदस्यांनाही मानधन दिले पाहिजे. सरपंच, उपसरपंचाच्या मानधनामध्ये काही प्रमाणात वाढ करणे आवश्यक आहे.

-सरपंच, नागभीड