युक्रेनमधून चंद्रपूरचे सहा विद्यार्थी स्वगृही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2022 05:00 IST2022-03-04T05:00:00+5:302022-03-04T05:00:40+5:30
सद्यस्थितीत रशिया व युक्रेन या दोन देशांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत युक्रेनमध्ये अडकलेल्या जिल्ह्यातील १२ विद्यार्थ्यांपैकी सहा विद्यार्थी सुखरूप स्वगृही परतले आहेत. चार विद्यार्थी दिल्ली येथे पोहचले असून, उर्वरित दोन विद्यार्थी येण्याच्या मार्गावर आहेत. यापैकी एक जण हंगेरी या देशाच्या सीमेवर असून, दुसरा विद्यार्थी रोमानिया या देशाच्या मार्गावर असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

युक्रेनमधून चंद्रपूरचे सहा विद्यार्थी स्वगृही
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सद्यस्थितीत रशिया व युक्रेन या दोन देशांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत युक्रेनमध्ये अडकलेल्या जिल्ह्यातील १२ विद्यार्थ्यांपैकी सहा विद्यार्थी सुखरूप स्वगृही परतले आहेत. चार विद्यार्थी दिल्ली येथे पोहचले असून, उर्वरित दोन विद्यार्थी येण्याच्या मार्गावर आहेत. यापैकी एक जण हंगेरी या देशाच्या सीमेवर असून, दुसरा विद्यार्थी रोमानिया या देशाच्या मार्गावर असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
चंद्रपूर जिल्ह्यात पोहोचलेल्या विद्यार्थ्यांमध्ये हर्षल बलवंत ठवरे (चिमूर), आदिती अनंत सायरे (वरोरा), साहिल संतोष भोयर (बल्लारपूर), खुशाल बिपुल बिस्वास (चंद्रपूर), शेख अलिशा करीम (राजुरा) आणि गुंजन प्रदीप लोणकर (चिमूर) या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. चिमूरची ऐश्वर्या प्रफुल खोब्रागडे, चंद्रपूर येथील धीरज असीम विश्वास आणि महेश भोयर तर ब्रह्मपुरी येथील महक उके दिल्ली येथे पोहोचले आहेत. भद्रावती येथील नेहा शेख ही हंगेरीच्या सीमेवर असून, चंद्रपूरचा दीक्षाराज अकेला हा रोमानिया देशाच्या सीमेकडे वाटचाल करीत असल्याची माहिती संबंधितांच्या नातेवाईकांनी प्रशासनाला दिली.
युक्रेनमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांनी जिल्हा प्रशासनासोबत संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आम्ही वाचलो, इतरही सुखरूप परतावे
बल्लारपूर : एमबीसीने दिलेल्या सूचनेमुळे आम्ही सुरक्षितरित्या घरी परतलोय, मात्र युद्ध सुरु झाल्यानंतर अजूनही बरेच भारतीय विद्यार्थी तिथे अडकले आहेत. तेदेखील सुखरूप घरी परतावे, अशी भावना युक्रेनहून आलेल्या बल्लारपूरच्या साहील संतोष भोयर या वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. साहील हा मागील पाच वर्षांपासून युक्रेनच्या जोफ्रोजेस्ट स्टेट वैद्यकीय विद्यापीठामध्ये शेवटच्या वर्षात शिकत आहे. त्यांनी सांगितले की, तिकडे दोन-तीन वर्षांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये छोटेछोटे युद्ध सुरूच होते. परंतु यावेळी सैनिकांची संख्या वाढल्यामुळे आम्हाला एमबीसीने १८ फेब्रुवारीला पत्र दिले की, सध्या तुम्ही हा देश सोडून आपल्या गावी परत जा. आपण विद्यापीठाची समस्या नंतर सोडवू. त्याप्रमाणे आम्ही हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या ६० विद्यार्थ्यांपैकी ३० विद्यार्थी बसने कीव्ह येथे गेलो व तेथून फ्लाइटने युद्ध सुरु होण्याच्या एक दिवस अगोदर निघालो. पण उर्वरित ३० विद्यार्थी हॉस्टेलमध्ये अडकून राहिले आणि दुसऱ्या दिवशी युद्धाचा धडाका सुरु झाला.