पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा पोळा फुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:35 IST2021-09-10T04:35:15+5:302021-09-10T04:35:15+5:30
चार उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांमध्ये चंद्रपूरचे शिलवंत नांदडेकर यांची बदली औरंगाबाद येथे आर्थिक गुन्हे शाखेचे उपपोलीस अधीक्षक म्हणून करण्यात आली ...

पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा पोळा फुटला
चार उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांमध्ये चंद्रपूरचे शिलवंत नांदडेकर यांची बदली औरंगाबाद येथे आर्थिक गुन्हे शाखेचे उपपोलीस अधीक्षक म्हणून करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर नागपूरचे सहायक पोलीस आयुक्त सुधीर पुंडलिक नंदनवार यांची चंद्रपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून बदली झालेली आहे. वरोराचे उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश पांडे यांची बदली अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर कुणाचीही वर्णी लागलेली नाही. चिमूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन बगाटे यांची बदली सिंधुदुर्ग येथे अपर पोलीस अधीक्षक म्हणून झालेली आहे. त्यांची जागाही रिक्तच आहे. मूलचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनुज तारे यांची बदली गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथे अपर पोलीस अधीक्षकपदावर करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवरही कुणालाही निुयुक्ती दिलेली नाही.
तीन उपविभागीय अधिकाऱ्यांच्या जागा झाल्या रिक्त
चंद्रपूर जिल्ह्यातील चारपैकी केवळ चंद्रपूरला नवीन उपविभागीय अधिकारी मिळाले आहे. मूल, वरोरा व चिमूर येथील उपविभागीय अधिकाऱ्यांच्या जागेवर एकाही अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात न आल्याने या जागा सध्यातरी रिक्त राहणार आहे.