शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
2
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
3
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
4
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
5
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
6
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
7
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
8
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
9
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
10
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
11
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
12
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
13
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
14
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
15
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
16
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
17
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
18
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
19
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
20
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

संपूर्ण दारूबंदीसाठी पोलीस घेणार लोकप्रतिनिधींची मदत

By admin | Updated: June 5, 2015 01:15 IST

चंद्रपूर जिल्ह्यात १ एप्रिलपासून दारूबंदी लागू झाली. दारूच्या दुकानांना कुलूप लागले. बिअरबारही बंद झाले आहेत. तरीही, लगतच्या जिल्ह्यांमधून दारू आणून येथे विकली जात आहे.

बल्लारपूर : चंद्रपूर जिल्ह्यात १ एप्रिलपासून दारूबंदी लागू झाली. दारूच्या दुकानांना कुलूप लागले. बिअरबारही बंद झाले आहेत. तरीही, लगतच्या जिल्ह्यांमधून दारू आणून येथे विकली जात आहे. आधी ज्या दारूची किंमत २० रुपये होती ती आता १०० रुपयाने विकली जात आहे. यामुळे, दारूबाज लुबाडले जात आहे व दारूबंदीचा फज्जा उडत आहे. हा प्रकार पूर्णत: बंद व्हावा, याकरिता बल्लारपूर पोलिसांनी पुढाकार घेऊन संपूर्ण दारूबंदीकरिता लोकप्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचे सहकार्य घेण्याकरिता पाऊल उचलले आहे. याची सुरुवात येथील नगरसेवकांची सभा घेऊन करण्यात आली.नगर परिषद सभागृहात पालिकेचे उपाध्यक्ष संपत कोरडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत पोलीस निरीक्षक नरूमणी टांडी, माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, भाजपाचे वरिष्ठ नेते व नगरसेवक चंदनसिंह चंदेल, शिवसेनेचे नेते व न.प. चे माजी उपाध्यक्ष सिक्की यादव, सहायक पोलीस निरीक्षक राठोड, कोंडावार, गंद्येवार, न.प.चे कार्यालय अधिक्षक विजय जांभुळकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दारूबंदीनंतरही बल्लारपुरात लपून छपून दारूविक्री होत आहे. त्यावर संपूर्ण बंदी करणे आवश्यक असून त्याकरिता लोकांचे सहकार्य गरजेचे आहे. यावर उपाययोजना म्हणून वॉर्डा-वॉर्डामध्ये समिती स्थापन करून ही समिती याबाबत पोलिसांना सहकार्य करेल. कुणी दारू विकत असल्याचे वा दारू पिऊन असल्याचे आढळल्यास तसे पोलिसांना समिती सदस्य कळवतील. महिला बचत गटानेही याकामी सहकार्य घेतले जाईल असे टांडी यांनी प्रास्ताविकातून सांगितले. यावर घनशाम मुलचंदानी, शांता बहुरिया, चंदनसिंह चंदेल, काँग्रेसचे गटनेता देवेंद्र आर्य, सिक्की याादव, गौरकार, विक्की दुपारे, संपत कोरडे यांनी काही सूचना मांडल्या. रेल्वेने आंध्रप्रदेशातून दारू कशी आणली जाते, कुठे उतरविली जाते. त्याकरिता काय उपाययोजना केली पाहिजे. या व्यवसायात तरुण मुलं उतरले असून त्यांना कसे रोखता येईल, यावर यात चर्चा करण्यात आली. अवैध दारू विक्रीत काही पोलिसांचाही सहभाग असल्याचा सूर सभेत उमटला त्यावर, तसे आढळल्यास अशा पोलिसांवर निश्चित कारवाई केली जाईल, असे आश्वासन टांडी यांनी सभागृहाला दिले. दारूबाबत कुणालाही पकडल्यास तो आपला माणूस आहे, त्याला सोडून द्या अशी शिफारस घेऊन कुणी येऊ नये असे टांडी यांनी सुचविले. संपूर्ण दारूबंदीकरिता, सर्वत्र पाळत ठेवण्याकरिता पोलिसांची एक टीमच तयार करण्यात आली आहे. या सभेत नगरसेवकांसह विजय मुके, निवलकर, सुभाष शिडाम, प्रतीश रायपुरे आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)