शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
2
“२ लाख ७० हजाराचा रेकॉर्ड मोडायचा, बारामती निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती पण…”: पार्थ पवार
3
कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही...
4
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
5
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
6
Ashok Kharat : "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती
7
लेकीला कडेवर घेऊन पाऊण तास उभा, १०० रिक्षांना हात दाखवला तरीही...; डोंबिवलीतील व्हिडीओ व्हायरल
8
हैवान! पित्याने आपल्या ७ मुलांना झोपेतच संपवलं, चार मुलं स्वत:च्या पत्नीपासून तर तीन मुलं...
9
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
10
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
11
Chanakya Niti: आचार्य चाणक्य म्हणतात, 'या' मानसिकतेमुळे लक्ष्मी पाठ फिरवते! तुम्ही तर ही चूक करत नाही ना?
12
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
13
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
14
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
15
MSRTC: एसटी आगार, परिसर स्वच्छतेचा करोडोंचा खर्च प्रवाशांच्या माथी
16
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
17
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
18
आयआयटीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक, राज्यातील शैक्षणिक संस्थांना सावधानीचा इशारा
19
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
20
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
Daily Top 2Weekly Top 5

अधिवेशनात गाजणार गुंठेवारी

By admin | Updated: June 4, 2014 23:38 IST

येथील नगरपालिकेने केलेल्या बोगस गुंठेवारीप्रकरणी तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आले. विधिमंडळाच्या येत्या पावसाळी अधिवेशनात यावर चर्चा होणार असून सरकार प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्याची शक्यता आहे.

बोगस प्रकरणाची चौकशी करा : तक्रारकर्त्यांची मागणीमूल : येथील नगरपालिकेने केलेल्या बोगस गुंठेवारीप्रकरणी तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आले. विधिमंडळाच्या येत्या पावसाळी अधिवेशनात यावर चर्चा होणार असून सरकार प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्याची शक्यता आहे. बोगस गुंठेवारी प्रकरणाची चौकशी वरिष्ठ अधिकार्‍यांमार्फत करण्याची मागणी तक्रारकर्ते अनिल मोगरे आणि अशोक मार्गनवार यांनी केली आहे.  राज्य शासनाने २00१ मध्ये काढलेल्या गुंठेवारी नियमांचे उल्लंघन करुन मूल नगरपालिकेने शेकडो एकर जमिनींची गुंठेवारी केले. यात अतिक्रमण केलेल्या शासकीय जमिनी व मिळालेल्या जमिनींचीही गुंठेवारी करण्यात आली. नगरपालिकेने केलेल्या या गुंठेवारी प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे गुंठेवारीची ही प्रकरणे उपविभागीय अधिकार्‍यांपर्यंत गेलीच नाही. बोगस गुंठेवारी करुन शासनाचे विकास शुल्कही गडप करण्याची किमया मूल नगरपालिकेने केली आहे.ब्रह्मपुरी येथील बोगस गुंठेवारी प्रकरण संपूर्ण राज्यभरात गाजले. गुंठेवारी प्रकरणाची चौकशी होऊन संबंधितांवर गुन्हे दाखल होऊन कारवाई सुरू आहे. परंतु मूल नगरपालिकेने केलेली बोगस गुंठेवारी ब्रह्मपुरीपेक्षा फार मोठी आहे. यात पालिकेचे तत्कालिन मुख्याधिकारी आणि कर्मचारी गुंतले आहेत.नगरपालिकेने केलेल्या बोगस गुंठेवारीचे प्रकरण चव्हाट्यावर आणल्यानंतर यासंबंधाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल मोगरे आणि अशोक मार्गनवार यांनी प्रकरणाची तक्रार आयुक्तांकडे केली.तसेच काही आमदारांनी भेट घेऊन विधिमंडळात या प्रकरणाचे प्रश्न उपस्थित केले. मोगरे आणि मार्गनवार यांच्या तक्रारीवरुन विधीमंडळाच्या नागपूर अधिवेशनात प्रकरणासंबंधाने लक्षवेधी सूचना सादर करण्यात आली होती. यावेळी शासनाने प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांना दिले. परंतु या प्रकरणाची चौकशी मंदावली असून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, आता हा विषय तारांकित प्रश्न लागल्यामुळे प्रशासकीय यंत्रणा माहिती गोळा करण्याच्या कामात व्यस्त झाली आहे. त्यामुळे शासनाने मूल नगरपालिकेने केलेल्या बोगस गुंठेवारी प्रकरणाची चौकशी वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मार्फतीने काटेकोर करणे आवश्यक आहे. पालिकेने बोगस गुंठेवारी करून नागरिकांची फसवणूक केलीच, शासनाचेही विकास शुल्क हडप केले. त्यामुळे प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी तक्रारकतर्फे अनिल मोगरे आणि अशोक मार्गनवार यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)