शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

गुणवत्तावाढीसाठी आता पालक अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 12:22 AM

समग्र शिक्षा अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आता प्रत्येक जिल्ह्यात शैक्षणिक सहाय्य करण्यासाठी पालक अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीबरोबरच शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी हातभार लागणार आहे.

ठळक मुद्देशिक्षण हक्क कायद्याची करणार अंमलबजावणी

राजकुमार चुनारकर।लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : समग्र शिक्षा अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आता प्रत्येक जिल्ह्यात शैक्षणिक सहाय्य करण्यासाठी पालक अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीबरोबरच शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी हातभार लागणार आहे.प्राथमिक शिक्षण परिषदेच्या वतीने समग्र शिक्षा अभियानाची अंमलबजावणी करण्यात येते. राष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक प्रगतीचे मूल्यमापन करण्यासाठी राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यास गुणवत्तेमध्ये देशात प्रथम क्रमांक मिळवण्याचे उद्दिष्ट दिले आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याला एक पालक अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदचे प्रकल्प संचालक वंदना कृष्णा यांनी यासंबंधीचे आदेश नुकतेच काढले आहेत.चंद्रपूरसाठी अभियंता नंदू बोरसे हे पालक अधिकारी आहेत. पायाभूत शैक्षणिक सुविधा व शाळांच्या समृद्धीसाठी समग्र शिक्षा अभियान राबवले जात आहे. याच्या माध्यमातून मुलांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे शिक्षकांच्या ज्ञानकक्षा समृद्ध व सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणे ही जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. राज्यभरात जिल्हानिहाय पालक अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.यात सहसंचालक, प्रकल्प उपसंचालक, मुख्य अभियंता, उपअभियंता, सहायक संचालक, लेखाधिकारी, कार्यक्रम अधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.‘शगून’ आॅनलाईन पोर्टल विकसितजिल्ह्यात शैक्षणिक सहाय्य, तेथील कामाची प्रगती, समन्वय व सनियंत्रणासाठी पालक अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. जिल्हा गुणवत्तेचा आढावा घेतल्यानंतर ते दरमहा काही शाळांची माहिती राज्य सरकारला पाठवणार आहेत. भारत सरकारकडून विविध उपक्रमांच्या यशस्वितेसाठी उपयोग व्हावा म्हणून ‘शगून’ हे आॅनलाईन पोर्टल विकसित करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने पालक अधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यातून शैक्षणिक विषयावरील पाच व्हिडीओ (इंग्लिश सब-टाईटल), केस स्टडीज, स्टेटेमोनियल ई-मेलवर पाठविण्याच्या सूचना आहेतशासनाच्या निर्देशानुसार चंद्रपूर जिल्ह्यासाठी अभियंता नंदू बोरसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीसह शाळांची गुणवत्ता वाढीसाठी मदत होणार आहे.-दीपेंद्र लोखंडेशिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि.प. चंद्रपूर

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र