शहरं
Join us  
Trending Stories
1
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
2
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
3
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
4
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
5
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
6
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
7
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
8
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
9
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
10
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
11
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
12
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
13
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
14
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
15
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
16
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
17
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
18
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
19
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
20
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

रूग्णवाढीचा आलेख घसरतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 05:00 IST

जुलै, ऑगस्टमध्ये चाचण्या वाढविण्यात आल्या. त्यामुळे रूग्णांची संख्याही वाढली. जिल्हा आरोग्य प्रशासनाने तपासणी, निदान व लवकर उपचार या त्रिसुत्रीचा प्रभावी वापर केल्याने रूग्णवाढीचा आलेख केवळ या आठवड्यात तरी खाली येत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. १८ सप्टेंबर ते २४ डिसेंबर २०२० या सात दिवसात नवे रूग्ण दीडशे तर बरे होणाऱ्यांच्या प्रमाणातही मोठे अंतर नाही. गत आठवड्यात हीच संख्या मोठी होती. त्यामुळे हजारांवर पोहोचल्याने चिंता व्यक्त केली जात होती.

ठळक मुद्देदिलासादायक । कोरोना बाधितांचे मृत्यू रोखणे आरोग्य प्रशासनासमोर आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली. त्यामुळे आठवडाभरात संसर्गाचा आलेख घसरत असल्याचे दिलासादायक चित्र पुढे आले आहे. सात दिवसात १७३३ नवे रूग्ण आढळले. तर १०९७ व्यक्ती उपचारानंतर बरे झाले आहेत. १८ सप्टेंबरला सर्वाधिक ३०३ रूग्णांची नोंद झाली आहे. मात्र, कोराना बाधित गंभीर रूग्णांची संख्या दरदिवशी दोन ते तीन असल्याने नागरिकांमध्ये दहशत कायम असल्याचे दिसून येत आहे.जुलै, ऑगस्टमध्ये चाचण्या वाढविण्यात आल्या. त्यामुळे रूग्णांची संख्याही वाढली. जिल्हा आरोग्य प्रशासनाने तपासणी, निदान व लवकर उपचार या त्रिसुत्रीचा प्रभावी वापर केल्याने रूग्णवाढीचा आलेख केवळ या आठवड्यात तरी खाली येत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. १८ सप्टेंबर ते २४ डिसेंबर २०२० या सात दिवसात नवे रूग्ण दीडशे तर बरे होणाऱ्यांच्या प्रमाणातही मोठे अंतर नाही. गत आठवड्यात हीच संख्या मोठी होती. त्यामुळे हजारांवर पोहोचल्याने चिंता व्यक्त केली जात होती.आरोग्य प्रशासनाने याच कालावधीत चाचण्यांची संख्या वाढवली आहे. नागरिकांनी स्वत:हून तपासणीसाठी केंद्रात यावे, यासाठी प्रयत्न सुरू असल्याने चंद्रपूर शहरात तरी रामनगर व बाबुपेठ येथील चाचणी केंद्रात नागरिकांची संख्या वाढली. जुलै व ऑगस्टमध्ये संशयित रूग्ण शोध मोही राबविण्यात आली. लवकर तपासणी, लवकर निदान आणि लवकर उपचार ही त्रिसूत्रीचा वापर करण्यात आला. राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यात माझे कुटुंंबमाझी जबाबदारी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेमुळे चाचण्यांचे प्रमाण वाढण्याचा अंदाज जिल्हा आरोग्य प्रशासनाने वर्तविला आहे.कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येतही वाढमागील सात दिवसात रूग्ण बरे होण्याच्या प्रमाणातही लक्षणीय वाढ झाली आहे. तालुका कोविड केअर सेंटर यासाठी उपयुक्त ठरले आहेत. या सेंटरमध्ये आरोग्य सुविधा वाढविल्यास पुन्हा चित्र बदलू शकेल, असा प्रशासनाचा दावा आहे.कोरोनामुक्तीसाठी ट्रीपल टी ही त्रिसूत्री वापरल्या जात आहे. मागील आठवड्यात कोरोना रूग्ण वाढीचा डबलिंग रेट १० होता. हा संसर्ग रेट १० पेक्षा जास्त असल्यास सप्टेंबर अखेरपर्यंत रूग्णांची संख्या २० हजार होण्याचा अंदाज आरोग्य विभागातील तज्ज्ञांनी वर्तविला होता. शनिवारपर्यंत बाधितांची संख्या ९ हजार ३५० झाली आहे. कोरोनामुक्तीचा वेग असाच राहिल्यास दिलासादायक ठरू शकते.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या