शहरं
Join us  
Trending Stories
1
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
2
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
3
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
4
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
5
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
6
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
7
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
8
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
9
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
10
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
11
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
12
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
13
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
14
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
15
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
16
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
17
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
18
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
19
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
20
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील शाळांमध्ये लागणार आता तक्रारपेटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 06:00 IST

अनेकदा ग्रामीण भागातील शाळांना शहरात येऊन तक्रारी कराव्या लागतात. याचबरोबर अनेकदा या तक्रारींचा निपटाराही होत नाही. यामुळे अनेक समस्या तशाच राहतात. त्या वेळेत सोडविल्या जात नाही. या तक्रारी भविष्यात वेळेवर सोडविल्या जाव्यात, यासाठी ही तक्रारी पेटीची योजना आखण्यात आली आहे. तक्रार निवारण समिती तक्रार पेटीतील तक्रारींचे निवारण करतील.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांच्या समस्या सुटणार : महिन्याच्या पहिल्या सोमवारी शाळेत शिक्षण दिन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शाळा न्यायाधिकरणाच्या अधिकार क्षेत्रात न येणाऱ्या तक्रारींवर कार्यवाही करण्यासाठी सद्यस्थितीत कोणतीही औपचारिक व्यवस्था नाही. त्यामुळे शाळा स्तरावर तक्रारींचे निराकरण होण्यात अडचणी येत आहेत. त्या तक्रारींचे निराकरण तातडीने व्हावे, या उद्देशाने लोकशाही दिनाच्या धर्तीवर आता दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी शिक्षण दिनाचे आयोजन केले जाणार आहे. तसेच शासनाकडून शाळा स्तरावर, जिल्हा स्तरावर आणि विभागीय स्तरावर तक्रार निवारण समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच प्रत्येक शाळांमध्ये तक्रार पेटीही बसविण्यात येणार आहे. या तक्रार पेटीत येणाऱ्या प्रत्येक तक्रारींचा निपटारा करण्यात येणार आहे.शाळेतील असुविधांपासून ते विविध प्रशासकीय कामांबाबत तक्रारी करण्यासाठी सध्या कोणतीच यंत्रणा अस्तित्वात नाही. यामुळे अनेकदा ग्रामीण भागातील शाळांना शहरात येऊन तक्रारी कराव्या लागतात. याचबरोबर अनेकदा या तक्रारींचा निपटाराही होत नाही. यामुळे अनेक समस्या तशाच राहतात. त्या वेळेत सोडविल्या जात नाही. या तक्रारी भविष्यात वेळेवर सोडविल्या जाव्यात, यासाठी ही तक्रारी पेटीची योजना आखण्यात आली आहे. तक्रार निवारण समिती तक्रार पेटीतील तक्रारींचे निवारण करतील. या समित्यांच्या माध्यमातून विद्यार्थी व पालकांनी केलेल्या गणवेश मिळाला नाही, कोणत्याही प्रकारचे शोषण झाले, शिक्षण हक्क कायद्याचे उल्लंघन झाले, अशा प्रकारच्या तक्रारींचे तातडीने निराकारण होऊ शकते. इतकेच नव्हे तर संस्थाचालकही यात संस्थात्मक वादाबाबतच्या तक्रारी करू शकणार आहेत. तर शाळा मान्यता प्रस्तावापासून ते इतर वादांच्या तक्रारी या माध्यमातून करून त्या सोडवू शकणार आहेत. तक्रारी करण्यासाठी दरवेळेस शिक्षण अधिकारी कार्यालयात न जाता त्या स्थानिक पातळीवर सोडविण्यासाठी ही यंत्रणा उभी करण्यात आल्याची माहिती आहे. या तक्रारींचे निवारण करण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी विविध ठिकाणी शिक्षण दिनाचे आयोजन केले जाणार आहे.अशा असणार तक्रार निवारण समित्याशाळा स्तरावर मुख्याध्यापक आणि शिक्षकांचा समावेश असलेली तक्रार निवारण समिती असेल. यामध्ये विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारींचे, शिक्षकांच्या तक्रारींचे निराकारण होऊ शकते. यानंतर जिल्हा स्तरावर तक्रार निवारण समिती असून यात जिल्हा शिक्षण अधिकारी, शिक्षण निरीक्षक, गटशिक्षणाधिकारी कार्यरत असतील. तसेच विभागीय स्तरावर उपसंचालकांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थी, पालक, शाळा व संस्था यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी विभागीय शिक्षण मंडळांचे अध्यक्ष, विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षण उपनिरिक्षक यांची एक समिती असणार आहे.

टॅग्स :Schoolशाळा