‘त्या’ दारूविक्रेत्याला अटक झाल्यानंतर सुरू झाली ग्रामसभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:32 IST2021-09-15T04:32:39+5:302021-09-15T04:32:39+5:30
प्राप्त माहितीनुसार सिंधी येथे ग्रामसभेच्या पूर्वसंध्येला प्रणय साईनाथ झुरमुरे या व्यक्तीला गावातील नागरिक व सभाध्यक्ष शोभा रायपल्ले यांनी दारू ...

‘त्या’ दारूविक्रेत्याला अटक झाल्यानंतर सुरू झाली ग्रामसभा
प्राप्त माहितीनुसार सिंधी येथे ग्रामसभेच्या पूर्वसंध्येला प्रणय साईनाथ झुरमुरे या व्यक्तीला गावातील नागरिक व सभाध्यक्ष शोभा रायपल्ले यांनी दारू वाटप करताना रंगेहात पकडून होमगार्ड कर्मचारी सुरेश दरेकर यांच्या ताब्यात दिले होते. ग्रामसभेत सभाध्यक्ष व सदस्यांनी दारू वाटप करणाऱ्यांना अटक होतपर्यंत सभा दीड तास तहकूब केली. अखेर प्रणय झुरमुरेला अटक केल्यानंतर सभा सुरळीत सुरू झाली; परंतु सभा सुरू असताना महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्ष निवडीच्या वेळी काही लोकांनी कर्मचाऱ्यांना मतमोजणी करताना अडथळा निर्माण केला. सभा अध्यक्षांनी राजकुमार दामेलवार यांच्या बाजूचे मतदान फेरमोजणीसाठी ग्रामसेवकांना सांगितले असता काहींनी फेरमोजणी होऊ दिली नाही. सभाध्यक्षानी हा विषय पटलावर न घेता सभा संपली, असे जाहीर केले. गोंधळामुळे तंटामुक्त समिती अध्यक्षांच्या नावाची घोषणा करण्यात आली नाही. सभेत दारूचे आमिष दाखवून गोंधळ घडवून आणणाऱ्यांवर पोलीस काय कारवाई करणार काय, याकडे गावातील नागरिकांचे लक्ष आहे.