शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

ृवृक्ष लागवडीसाठी शासकीय कार्यालये उदासीन

By admin | Updated: June 25, 2015 01:14 IST

दिवसेंदिवस पर्यावरणाचा ढासळता समतोल लक्षात घेऊन शासनाने विविध योजनांच्या माध्यमातून शासकीय कार्यालयांना प्रत्येक वर्षी ...

ब्रह्मपुरी : दिवसेंदिवस पर्यावरणाचा ढासळता समतोल लक्षात घेऊन शासनाने विविध योजनांच्या माध्यमातून शासकीय कार्यालयांना प्रत्येक वर्षी येणाऱ्या पावसाळ्यात वृक्षांची लागवड करणे व जोपासने यासाठी कोट्यवधी रुपये दिले. परंतु वृक्ष लागवडीसंदर्भात व जगविण्याच्या बाबतीत शासकीय कार्यालयात उदासीनता दिसून येत आहे.पावसाळा सुरू होऊन १० ते १५ दिवसांचा कालावधी लोटला असतानादेखील वृक्ष लागवडीला अद्यापही शासकीय कार्यालयांना मुहर्त सापडलेला नाही. त्याचप्रमाणे शासनाच्या वतीने विविध कार्यालयातील अधिकाऱ्यांमार्फत वृक्ष लागवड केली जाते. पण जुन्या खड्ड्यात नवे झाड लावण्यात शासकीय कार्यालयातील अधिकारी माहिर झाले आहेत. लावलेल्या वृक्षांचे संगोपन होत नसल्याने वृक्ष उन्मळून पडतात किंवा मृत होतात. त्यामुळे वृक्ष लागडीवर होणारा खर्च कोट्यवधीचा असल्याने वाया जात आहे. म्हणून महाराष्ट्र शासनाने वृक्ष लागवडीपेक्षा संगोपन व संरक्षणाला अधिक महत्त्व देऊन त्याकरिता भरीव निधीची तरतूद केली आहे. शासनाने मागच्या वर्षीपासून शतकोटी वृक्ष लागवड कार्यक्रम सुरू केला असून विविध शासकीय कार्यालयांना सहभागी करुन वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. वृक्ष लागवड दरवर्षी कागदोपत्री दाखविण्यात येते व त्यावर कोट्यवधी रुपयांची देयके काढण्यात आल्याची माहिती आहे. पंचायत समिती, ग्रामपंचायत वनविभाग, सामाजिक वनीकरण विभाग, लघु पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, लघुसिंचन विभाग, कृषी विभाग, नगर परिषद व इतर सामाजिक संस्था आदी शासकीय कार्यालयांचा वृक्ष लागवडीत समावेश करण्यात आला आहे. परंतु, यंदा मात्र या कार्यालयांची उदासीनता दिसून येत आहे. या कार्यक्रमांतर्गत मजुरांना काम मिळत होते. तेसुद्धा बंद झाल्याने याबाबत विचार करण्याची गरज असून वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)