शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

गोसेखुर्द धरणाच्या पाण्याला वाट

By admin | Updated: November 17, 2015 02:00 IST

गोसेखुर्द धरण या ना त्या कारणाने परिसरात नेहमीच चर्चेत राहत असते. गराडी नाल्याजवळ मागील वर्षी

ब्रह्मपुरी : गोसेखुर्द धरण या ना त्या कारणाने परिसरात नेहमीच चर्चेत राहत असते. गराडी नाल्याजवळ मागील वर्षी चाचणीदरम्यान बांधकाम वाहून गेल्याने पाणी सोडण्याकरिता विभागाला कसरत करावी लागली. दरम्यान शेतकऱ्याच्या व लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार पाईपद्वारे पाणी सोडण्यात विभागाला काही अंशी यश आले. पण गोसेखुर्द धरणाचे काम कोणत्या दर्जाचे झाले आहे, याचा प्रत्यय पुन्हा पुन्हा पाहावयास मिळणार आहे. धरणाच्या साईडिंग वॉलमधून चांदगाव जवळ गराडी नाल्यापुढे पाणी झिरपून लिक झाल्याने समोरच्या शेताला डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले. त्यामुळे गोसेखुर्द धरणाच्या पाण्याला पुन्हा वाट फुटल्याची चर्चा होताना दिसून येत आहे.गोसेखुर्द धरणाचा उजवा कालवा ब्रह्मपुरी तालकुयातील तोरगाव, खेड, दुधवाही, चांदगाव, जूगनाळा, गांगलवाडी, मुडझा आदी भागातून आसोला मेंढा तलावाकडे गेला आहे. परंतु ब्रह्मपुरी तालुक्यात गोसीखुर्द कालव्याचे क्रमांक एक ते क्रमांक पाचपर्यंतचे सर्वच विभाग आहेत. तरीही कामे अपूर्ण असून पूर्ण झालेले कामे निकृष्ट असल्याचे बोलले जात आहे. केवळ बोलले जात असले त्यावर कितपत विश्वास ठेवायचा हा प्रश्न असताना त्याचा प्रत्ययही जेव्हा दिसून लागतो तेव्हा त्यावर विश्वास ठेवावाच लागत असल्याने चांदगाव जवळ हाता पाण्याला पाळीच्या अंतर्गत भागातून वाट फुटल्याने शेजारच्या शेतजमिनीला डबक्याचे रूप प्राप्त झाले आहे. पाईप लाइन टाकलेल्या भागात पाणी वाहून जात असताना मात्र दुसरीकडे साईडिंग वॉलची सुद्धा अशी दुर्दशा असल्याने गोसेखुर्द धरणाच्या पाण्याचे नवनवीन प्रयोग पाहावयास येत असल्याने परिसरातील शेतकरी हतबल आहे. (तालुका प्रतिनिधी)