शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

देवी महाकाली यात्रेसाठी प्रशासन सज्ज

By admin | Updated: March 31, 2017 00:39 IST

संपूर्ण जिल्ह्यात ओळख व अस्मिता असणाऱ्या देवी महाकालीच्या नवरात्र उत्सवास २ एप्रिलपासून सुरुवात होत आहे.

चंद्रपूर शहर वाहतूक मार्गात बदल : अवैध वाहतूक टाळण्याचे आवाहन चंद्रपूर : संपूर्ण जिल्ह्यात ओळख व अस्मिता असणाऱ्या देवी महाकालीच्या नवरात्र उत्सवास २ एप्रिलपासून सुरुवात होत आहे. यासाठी प्रशासन सज्ज झाले असून सुमारे महिनाभर चालणाऱ्या या उत्सवादरम्यान नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. या काळामध्ये करण्यात आलेल्या वाहतूक बदलाचे पालन व्हावे व यात्रेत येणाऱ्या भाविकांनी अधिकृत प्रवासी वाहनानेच प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा व महानगरपालिका प्रशासनाने या परिसरातील साफसफाई मोहीम गेल्या अनेक दिवसांपासून सुरु केली असून अनेक कार्य अंतिम टप्प्यात आहे. या यात्रा महोत्सवाच्या निमित्ताने दरवर्षी चंद्रपूरचे नागरिक अन्य प्रदेशातून येणाऱ्या भाविकांचे मोठ्या आदरतित्यांने स्वागत करतात. यावर्षीही मोठ्या प्रमाणात स्वंयसेवी संस्था या संदर्भात कार्यरत झाल्या आहेत. महीनाभर चालणाऱ्या यात्रेत महाकालीच्या दर्शनासाठी येणारे स्थानिक तसेच इतर जिल्ह्यातील भाविक हे बहुतांशी वेगवेगळया प्रवासी वाहनातून प्रवास करुन येत असतात. तसेच प्रवासी वाहनाच्या व्यतिरिक्त माल वाहतूक करणाऱ्या वाहनामधून देखील मोठ्या प्रमाणावर भाविक प्रवास करुन येत असतात. देवी महाकालीच्या दर्शनासाठी येताना बहुतेक भाविक वाहन प्रवासी आसन क्षमतेपेक्षा कितीतरी जास्त प्रवासी बसवून धोकादायक परिस्थितीत प्रवास करतात. अशावेळी एखादा दुदैवी अपघात घडतात. हे अपघात टाळावे, असे आवाहन एसपींनी केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)वाहतुकीत बदलमहाकाली यात्रेनिमित्त वाहतुकीत बदल करण्यात आलेला आहे. यामध्ये बागला नगर, महाकाली वार्ड, भिवापूर वार्ड या यात्रा परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी शहरात जाण्या-येण्यास किंवा घरी परतण्यास भिवापूर-हनुमान खिडकी-दादमहल वार्ड मार्गाचा वापर करावा. निर्धारीत कालावधीमध्ये अंचलेश्वर गेट ते बागला चौक हा मार्ग सायकल खेरीज सर्व वाहनांकरिता बंद करण्यात आल्याने इतर वाहनधारकांनी बायपास रस्त्याचा उपयोग करावा. चंद्रपूर शहरातील रामाळा तलाव मार्गे जटपूरा गेटकडे येणारी दुचाकी, चारचाकी व इतर वाहने ही जटपूरा गेट बाहेर विरुध्द दिशेने न जाता सरळ मौलाना आझाद चौकातून, आझाद बगीचाच्या बाजूचे रिंग रोडने जयंत टॉकीज चौकातून वळण घेऊन महात्मा गांधी मार्गाने जटपूरा गेट मधून बाहेर जातील.