गावाला जाण्याचे प्रमाणपत्र द्या; नागरिकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 05:01 IST2020-05-06T05:00:00+5:302020-05-06T05:01:08+5:30

लॉकडाऊननंतर अनेक जण विविध ठिकाणी अडकले आहेत. काही नागरिकांना आणण्यासाठी प्रशासकीय स्तरावर प्रयत्न करण्यात आले असून ते स्वगावी परतले तर काहींना अजूनही घरी जाण्याची प्रतीक्षा आहे. त्यामुळे सदर नागरिक प्रशासकीय परवानगीसाठी धडपड करीत आहेत. काही दिवसांपूर्वी बाहेर गावाला जाण्यासाठी पोलीस प्रशासन तसेच डॉक्टरांचे प्रमाणपत्र घेणे गरजेचे होते.

Give a certificate of going to the village; Crowds of citizens | गावाला जाण्याचे प्रमाणपत्र द्या; नागरिकांची गर्दी

गावाला जाण्याचे प्रमाणपत्र द्या; नागरिकांची गर्दी

ठळक मुद्देबंदोबस्त हवा : एसडीओ कार्यालयात झालेल्या गर्दीमुळे फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : लॉकडाऊनच्या काळामध्ये बाहेर गावाला अडकलेल्यांना आणण्यासाठी व बाहेरून आपल्या लोकांना परत आण्यासाठी उपविभागीय कार्यालयातून प्रमाणपत्र देण्यात येत आहे. या प्रमाणपत्रांसाठी मंगळवारी चंद्रपूर एसडीओ कार्यालयात नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. यामध्ये कोणीही फिजिकल डिस्टन्सिंग पाळत नसल्याचे चित्र बघायला मिळाले.
लॉकडाऊननंतर अनेक जण विविध ठिकाणी अडकले आहेत. काही नागरिकांना आणण्यासाठी प्रशासकीय स्तरावर प्रयत्न करण्यात आले असून ते स्वगावी परतले तर काहींना अजूनही घरी जाण्याची प्रतीक्षा आहे. त्यामुळे सदर नागरिक प्रशासकीय परवानगीसाठी धडपड करीत आहेत. काही दिवसांपूर्वी बाहेर गावाला जाण्यासाठी पोलीस प्रशासन तसेच डॉक्टरांचे प्रमाणपत्र घेणे गरजेचे होते. मात्र आता उपविभागीय अधिकाऱ्यांना परवानगीचे अधिकार देण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एसडीओ कार्यालयामध्ये गर्दी झाली होती. चंद्रपूर उपविभागीय कार्यालयाच्या सेतू केंद्रामध्ये सकाळपासूनच नागरिकांनी प्रमाणपत्रासाठी रांगा लावल्या होत्या. यामध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचा पूर्णत: फज्जा उडाल्याचे चित्र बघायला मिळाले.

गर्दीवरील नियंत्रणात अपयश
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उपविभागीय कार्यालय, तहसील कार्यालय तसेच अन्य काही शासकीय कार्यालय आहे. मात्र मंगळवारी एसडीओ कार्यालय परिसरात मोठी गर्दी बघायला मिळाली. जिल्ह्यात कोरोना रुग्ण आढळल्यानंतर जिल्हा प्रशासन सर्तक झाले आहे. असे असताना या गर्दीने मात्र नागरिकांवर प्रशासनाचे नियंत्रण नसल्याचे दिसून आले.
 

Web Title: Give a certificate of going to the village; Crowds of citizens