शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

मूल तालुक्यात मुलींचा जन्मदर वाढला

By admin | Updated: February 1, 2016 00:55 IST

शासकीय निकषाप्रमाणे एक हजार पुरुषामागे ९६० महिला असाव्यात. जेणेकरून असमानता निर्माण होणार नाही.

राजू गेडाम  मूलशासकीय निकषाप्रमाणे एक हजार पुरुषामागे ९६० महिला असाव्यात. जेणेकरून असमानता निर्माण होणार नाही. यासाठी महिलांचे प्रमाण पुरुषांच्या बरोबरीने आणण्याचा प्रयत्न शासनस्तरावर सुरू आहे. गर्भलिंग निदानावर बंदी घातल्यामुळे शहराबरोबरच ग्रामीण भागातसुद्धा मुलीचे प्रमाण मुलांपेक्षा जास्त दिसून येत आहे. मूल शहराबरोबरच तालुक्यातसुद्धा मुलीचे जन्माचे प्रमाण मुलांपेक्षा जास्त दिसत असल्याने भविष्यात निर्माण होणाऱ्या असमानतेला ब्रेक लागला आहे.दिवसेंदिवस मुलीचे प्रमाण घटत असल्याने चिंतेची बाब वाटायला लागली होती. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने लिंग निदान चाचणीवर बंदी आणून मुलीच्या जन्माचे प्रमाण वाढविण्याचा प्रयत्न केला. त्यात समाधानकारक ध्येय गाठण्यास शासनास यश आल्याचे दिसून येते.मूल शहरातील एकूण १७ वार्डातील ० ते ६ वर्षे वयोगटानुसार एप्रिल ते डिसेंबर २०१५ पर्यंत १३५ मुलींचा जन्म झाला तर ११४ मुलांचा जन्म झाला आहे. मुलांपेक्षा २१ मुली जास्त जन्माला आल्या असल्याचे दिसून येते. तालुक्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्रातसुद्धा जन्माचे प्रमाण समाधानकारक दिसत आहेत. प्राथमिक स्वास्थ केंद्रांतर्गत येणाऱ्या गावात एप्रिल ते डिसेंबर २०१५ पर्यंत ७८ मुली तर ७९ मुले, चिरोली प्राथमिक आरोग्य केंद्रात ६९ मुली तर ७५ मुले, राजोली प्राथमिक आरोग्य केंद्रात ५९ मुली तर ६८ मुले व बेंबाळ प्राथमिक आरोग्य केंद्रात ७४ मुली तर ७३ मुले जन्माला आलेली आहेत. यावरुन पुरुष-स्त्रिया यांच्या जन्माचे प्रमाण खुपच अंतराने होत असल्याने सर्वत्र चिंता व्यक्त केली जात होती. भविष्यात महिलांची संख्या कमी होत असल्याने चिंता व्यक्त केली जात होती. मात्र शासनाने लिंग निदान चाचणीवर बंदी आणून कडक कायदा केल्याने मुलीचे जन्माचे दर वाढण्यास मदत झाली आहे. हीच मुलींची जन्माची स्थिती राहिली तर स्त्रीसंख्या कमी होत असल्याची ओरड शासन स्तरावर कमी होईल व एक हजार पुरुषामागे ९६० महिला हे सुत्र शासनाच्या निकषाप्रमाणे झाल्यास पुरुष-महिलांच्या असमानतेची दरी भरून निघेल.