शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
2
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
3
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
4
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
5
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
6
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
7
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
8
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
9
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
10
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
11
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
12
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
13
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
14
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
15
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
16
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
17
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
18
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
19
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
20
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

घुग्घुस ते वर्धा नदीपर्यंतचा मार्ग ठरतोय मृत्युकुंड

By admin | Updated: October 11, 2015 02:20 IST

येथील बसस्थानकापासून बेलोरा नायगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून चौपदरीकरणाचे काम कासवगतीने सुरू आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष : लोकप्रतिनिधीही सुस्तघुग्घुस : येथील बसस्थानकापासून बेलोरा नायगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून चौपदरीकरणाचे काम कासवगतीने सुरू आहे. रस्त्यावरून अहोरात्र जडवाहनाबरोबर अन्य वाहनांची वाहतूक सुरू असते. मात्र सदर रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दररोज अपघात घडत असल्याने सध्या हा रस्ता मृत्युकुंडच ठरत आहे.घुग्घुस ते पडोलीपर्यंतच्या मागाच्या चौपदरीकरणाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. मात्र घुग्घुस बसस्थानक ते पुढे वर्धा नदीवरील पुलापर्यंतचे काम अधून-मधून केले जात आहे. रस्त्याच्या डागडुजीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने वाहनचालकाला खड्डयातून रस्ता शोधावा लागत आहे. रस्त्यावरून अधिकांश दुचाकी वाहनाने वेकोलिच्या कामगारांची वर्दळ आणि जडवाहनांची वाहतूक सुरू असते. या वाहतुकीमुळे रस्त्यावरील कोळशाची धूळ मोठ्या प्रमाणावर वातावरणात पसरते. त्यामुळे वाहनांच्या मागे असलेल्या वाहनचालकांना रस्ता दिसत नाही. आणि त्यातही खडयातून चालकांना रस्ता शोधावा लागत असल्याने दुहेरी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे रात्री-बेरात्री वेकोलिच्या कामगाराना व त्या रस्त्यावरून वणीकडे जाणाऱ्या दुचाकी वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. वर्धा नदीच्या पुलावरील खड्डे व त्या पुलाच्या देखरेखीकडे प्रशासन व लोकप्रतिनिधी डोळेझाक करीत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. (वार्ताहर)