शहरं
Join us  
Trending Stories
1
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
2
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
3
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
4
हाकेंचा बीपी वाढला; लेखी आश्वासन शिवाय उपचार नाही - लक्ष्मण हाके 
5
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
6
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
7
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
8
"...तर चंद्राबाबू नायडूंना पाठिंबा देऊ"; लोकसभा अध्यक्षपदाबाबत संजय राऊतांचे विधान
9
'चंदू चॅम्पियन'मध्ये पोलिस इन्स्पेक्टरच्या भुमिकेत श्रेयस तळपदे, कार्तिक आर्यनचं कौतुक करत म्हणाला...
10
Rishabh Pant : मोठ्या मनाचा रिषभ पंत! 'ती' सर्व कमाई दान करणार; चाहत्यांना दिले वचन
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!
12
सारांश : विकासाचे मार्ग आता प्रशस्त होण्याची अपेक्षा!
13
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
14
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
15
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
16
शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा
17
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
18
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा
19
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
20
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत

गायमुखचा अव्याहत वाहणारा झरा अचानक बंद!

By राजेश भोजेकर | Published: January 23, 2024 11:54 AM

जिल्ह्यातील आणि पंचक्रोशीतील भाविक विशेषतः याठिकाणी शनिवारी आणि सोमवारी भेट देऊन मनोभावे पूजा अर्चा करीत असतात.

चंद्रपूर : नागभीड तालुक्यातील गायमुख येथे अनादिकाळापासून अव्याहत वाहणारा झरा अचानक बंद झाल्याने भाविकांमध्ये खळबळ उडाली आहे. झालेला प्रकार पाहण्यासाठी मंगळवारी सकाळपासूनच भाविक गर्दी करीत आहेत.      नागभीड तालुक्यातील गायमुख येथे जंगल व्याप्त परिसरात एका टेकडीतून अनादिकाळापासून पाण्याचा एक झरा अव्याहत वाहत आहे. या ठिकाणी गोमुख बसविण्यात आला आहे. या ठिकाणी जागृत हनुमानाचे मंदिरही आहे. जिल्ह्यातील आणि पंचक्रोशीतील भाविक विशेषतः याठिकाणी शनिवारी आणि सोमवारी भेट देऊन मनोभावे पूजा अर्चा करीत असतात. दरवर्षी मकर संक्रांतीला येथे मोठी यात्राही भरते. शासनाने या ठिकाणास पर्यटन स्थळाचा दर्जाही दिला आहे. याच वर्षी या ठिकाणी बरीच विकास कामे करण्यात आली.          अगदी सोमवारपर्यंत हा झरा अव्याहत सुरू होता. मात्र मंगळवारी सकाळी हा झरा अचानक बंद झाल्याचे दिसून आले. लोकमत प्रतिनिधीने या ठिकाणी भेट दिली असता भाविकांनी चांगलीच गर्दी केली होती. प्रत्येकांकडून झालेल्या प्रकाराबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते.

------------------------------

रात्री बारा वाजताच्या सुमारास जय श्रीराम अशा एक दोन लोकांच्या घोषणा ऐकू आल्या. भाविक आंघोळीसाठी आले असतील म्हणून उठलो, तर पाण्याचा झरा बंद असल्याचे दिसून आले. मंगळवारी सकाळी घडलेल्या प्रकाराची देवस्थानच्या व्यवस्थापकांना माहिती दिली.- श्रावण धोंडूजी राऊत, पुजारी, गायमुख देवस्थान.

झरा हा पाण्याचा प्रवाह आहे. गायमुख येथील झरा वाहने बंद झाला याला कुठलीही दैवी शक्ती कारणीभूत नाही.भुगर्भात होणाऱ्या हालचालींवर अवलंबून असलेली शक्ती आहे. आजूबाजूच्या परिसरात पाण्याचा निचरा झाल्याने, किंवा पाण्याची पातळी खोल गेल्याने सुद्धा याचा झऱ्यावर परिणाम झाला असावा. कदाचित कालांतराने हा झाला पुन्हा वाहने सुरू होण्याची ही शक्यता नाकारता येत नाही.- प्रा. डॉ. रवी रणदिवे, भूगोल विभाग प्रमुख, गो. वा. महाविद्यालय, नागभीड.

टॅग्स :Vidarbhaविदर्भ