शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

मराठी शाळांचे भवितव्य धोक्यात

By admin | Updated: March 26, 2016 00:47 IST

नगरपालिकेल्या मराठी शाळेच्या घटणाऱ्या प्रवेशाला शासनच जबाबदार असल्याने मागेल त्याला शाळा या धोरणामुळे मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहे.

विद्यार्थी पटसंख्येत घट : मुलभूत सुविधा पुरविण्याकडे नगर परिषदेचे दुर्लक्षवरोरा : नगरपालिकेल्या मराठी शाळेच्या घटणाऱ्या प्रवेशाला शासनच जबाबदार असल्याने मागेल त्याला शाळा या धोरणामुळे मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहे. या शाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी स्थानिक नगरपरिषदेच्या सदस्यांना प्रभागनिहाय जबाबदारी द्यावी, अशी मागणी शिक्षणप्रेमीकडून केली जात आहे.‘मागेल त्याला शाळा’ असे धोरण अवलंबल्याने वरोरासह परिसरात अशा शाळेचे पेव फुटले आहे. या धोरणामुळे शहरात १५ शाळेच्या जवळपास इंग्रजी शाळांचे जाळे पसरले असल्याने मराठी शाळांमध्ये पालकांचा कानाडोळा होत आहे. त्यामुळे मराठी शाळांची पटसंख्या प्रत्येक वर्षी कमी होत आहे.खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांमुळे विद्यार्थी व पालकांचे अशा शाळांकडे वाढणारे आकर्षण, यामुळे मराठी शाळा ओस पडत आहे.वरोरा शहरात नगरपालिकेमार्फत सात मराठी शाळा सुरू आहे. मात्र प्रशासनाने केलेले दुर्लक्ष भविष्यात मध्यमवर्गीयांना न पेलणारे आहे. शहराच्या लोकसंख्येचा विचार करता त्या गावातील मराठी शाळेत १० टक्केसुद्धा विद्यार्थी नसल्याने शिक्षक संभ्रमावस्थेत आहे. अशा शाळा वाचविण्यासाठी स्थानिक नगर परिषद सदस्यांना प्रभागनिहाय जबाबदारी देऊन शाळेचा पट वाढविणे गरजेचे आहे.मराठी शाळेतील वर्ग इमारत, स्वच्छतागृह, पाण्याची व्यवस्था, क्रीडांगण, दर्जेदार शिक्षण, शालेय परिसर यांच्याकडे नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने या शाळा मोडकळीस आल्या आहेत. पटसंख्या वाढविण्यासाठी या प्राथमिक दर्जाच्या सुविधांमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. या सोईसुविधांच्या सुधारणेमुळेच शाळांची पटसंख्या वाढेल अन्यथा या शाळा ओस पडल्यास शासनच जबाबदार असेल. नगरपालिका तसेच शाळा व्यवस्थापन समिती यांनी पुढाकार घेऊन भविष्यात विद्यार्थ्याशिवाय बंद पडणाऱ्या शाळा वाचविणे गरजेचे आहे. (शहर प्रतिनिधी)