शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

सहाही जणांवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 06:01 IST

विशेष म्हणजे, एक वर्षापूर्वी कोरपना तालुक्यातील हेटीजवळ झालेल्या अपघातात तब्बल १० जणांचा बळी गेला होता. त्यानंतरचा बुधवारी घडलेला हा मोठा अपघात होता. गुरुवारी चंद्रपुरातील चौकाचौकात याच अपघाताची चर्चा सुरू असल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देचंद्रपुरात शोककळा : दिवसभर शहरात अपघाताचीच चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : भंडारा जिल्ह्यातील प्रतापगड येथे देवदर्शनासाठी गेलेल्या चंद्रपूर येथील नागरिकांचे वाहन बुधवारी रात्री मूल-चंद्रपूर मार्गावरील केसलाघाट येथे उभ्या ट्रकला धडकले. यात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर सात जण गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच गुरुवारी चंद्रपुरात शोककळा पसरली. मृतक सहाही जणांवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.विशेष म्हणजे, एक वर्षापूर्वी कोरपना तालुक्यातील हेटीजवळ झालेल्या अपघातात तब्बल १० जणांचा बळी गेला होता. त्यानंतरचा बुधवारी घडलेला हा मोठा अपघात होता. गुरुवारी चंद्रपुरातील चौकाचौकात याच अपघाताची चर्चा सुरू असल्याचे दिसून आले.चंद्रपूर येथील संभाजी भोयर, कुसूम भोयर, मनिषा भोयर, जियान भोयर, दत्तु झोडे, मिनाक्षी झोडे, शशिकला वांढरे, जितेंद्र परपेल्लीवार, अंकिता पेटकुले, क्रिस पाटील, सोमाजी पाटील, शिला पाटील, रेखा खारेकर हे देवदर्शनासाठी स्कार्पिओने (क्रमांक एमएच ३४ एबी ९७८६) भंडारा जिल्हातील प्रतापगड येथे गेले होते. देवदर्शन करून चंद्रपूरला परत जात असताना केसलाघाट ते नागाळाजवळ नादुरूस्त असलेला उभ्या ट्रकला (क्रं. एमएच ३४ एबी २५३३) स्कॉपीओने मागून धडक दिल्याने सहा जण जागीच ठार झाले, यात सभाजी भोयर (७७), कुसूम भोयर (६५), जियान भोयर (दीड वर्ष), दत्तु झोडे (५०), मिनाक्षी झोडे (३३), शशिकला वांढरे (६५) हे जागीच ठार झाले. यातील काही मृतक येथील बालाजी वार्ड व नगिनाबाग येथील रहिवासी आहेत. संभाजी भोयर आणि दत्तु झोडे हे स्कॉर्पिओ वाहनामध्ये फसून असल्याने त्यांना पहाटे बाहेर काढण्यात आले. मनिषा भोयर, जितेंद्र परपेल्लीवार, अंकिता पेटकुले, क्रिस पाटील, सोनी पाटील, शिला पाटील, रेखा खारेकर हे गंभीर जखमी झालेत. यातील काही जण बाबुपेठ येथील रहिवासी असल्याचे समजते. त्यांना चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. सर्व जखमींची प्रकृती चिंताजनक नसल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेची वार्ता गुरुवारी चंद्रपुरात पसरली. एकाचवेळी सहा जणांचा मृत्यू झाल्याने शहरात शोककळा पसरली होती. सहाही जणांवर शोकाकूल वातावरणात येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.लोकमतने वेधले होते लक्षरस्ते अपघाताबाबतची जनजागृती मोहीम लोकमतने हाती घेतली आहे. या संदर्भातील वृत्त गुरुवारी लोकमतने प्रकाशित करून गंभीरता समोर आणली. याचवेळी सदर अपघात घडून सहा जणांचा मृत्यू झाला. या घटनेसोबतच लोकमतच्या वृत्ताचीही चर्चा होती.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू