सहाही जणांवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 06:00 AM2020-02-21T06:00:00+5:302020-02-21T06:01:13+5:30

विशेष म्हणजे, एक वर्षापूर्वी कोरपना तालुक्यातील हेटीजवळ झालेल्या अपघातात तब्बल १० जणांचा बळी गेला होता. त्यानंतरचा बुधवारी घडलेला हा मोठा अपघात होता. गुरुवारी चंद्रपुरातील चौकाचौकात याच अपघाताची चर्चा सुरू असल्याचे दिसून आले.

Funeral in mournful atmosphere at all | सहाही जणांवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

सहाही जणांवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

Next
ठळक मुद्देचंद्रपुरात शोककळा : दिवसभर शहरात अपघाताचीच चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : भंडारा जिल्ह्यातील प्रतापगड येथे देवदर्शनासाठी गेलेल्या चंद्रपूर येथील नागरिकांचे वाहन बुधवारी रात्री मूल-चंद्रपूर मार्गावरील केसलाघाट येथे उभ्या ट्रकला धडकले. यात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर सात जण गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच गुरुवारी चंद्रपुरात शोककळा पसरली. मृतक सहाही जणांवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
विशेष म्हणजे, एक वर्षापूर्वी कोरपना तालुक्यातील हेटीजवळ झालेल्या अपघातात तब्बल १० जणांचा बळी गेला होता. त्यानंतरचा बुधवारी घडलेला हा मोठा अपघात होता. गुरुवारी चंद्रपुरातील चौकाचौकात याच अपघाताची चर्चा सुरू असल्याचे दिसून आले.
चंद्रपूर येथील संभाजी भोयर, कुसूम भोयर, मनिषा भोयर, जियान भोयर, दत्तु झोडे, मिनाक्षी झोडे, शशिकला वांढरे, जितेंद्र परपेल्लीवार, अंकिता पेटकुले, क्रिस पाटील, सोमाजी पाटील, शिला पाटील, रेखा खारेकर हे देवदर्शनासाठी स्कार्पिओने (क्रमांक एमएच ३४ एबी ९७८६) भंडारा जिल्हातील प्रतापगड येथे गेले होते. देवदर्शन करून चंद्रपूरला परत जात असताना केसलाघाट ते नागाळाजवळ नादुरूस्त असलेला उभ्या ट्रकला (क्रं. एमएच ३४ एबी २५३३) स्कॉपीओने मागून धडक दिल्याने सहा जण जागीच ठार झाले, यात सभाजी भोयर (७७), कुसूम भोयर (६५), जियान भोयर (दीड वर्ष), दत्तु झोडे (५०), मिनाक्षी झोडे (३३), शशिकला वांढरे (६५) हे जागीच ठार झाले. यातील काही मृतक येथील बालाजी वार्ड व नगिनाबाग येथील रहिवासी आहेत. संभाजी भोयर आणि दत्तु झोडे हे स्कॉर्पिओ वाहनामध्ये फसून असल्याने त्यांना पहाटे बाहेर काढण्यात आले. मनिषा भोयर, जितेंद्र परपेल्लीवार, अंकिता पेटकुले, क्रिस पाटील, सोनी पाटील, शिला पाटील, रेखा खारेकर हे गंभीर जखमी झालेत. यातील काही जण बाबुपेठ येथील रहिवासी असल्याचे समजते. त्यांना चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. सर्व जखमींची प्रकृती चिंताजनक नसल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेची वार्ता गुरुवारी चंद्रपुरात पसरली. एकाचवेळी सहा जणांचा मृत्यू झाल्याने शहरात शोककळा पसरली होती. सहाही जणांवर शोकाकूल वातावरणात येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

लोकमतने वेधले होते लक्ष
रस्ते अपघाताबाबतची जनजागृती मोहीम लोकमतने हाती घेतली आहे. या संदर्भातील वृत्त गुरुवारी लोकमतने प्रकाशित करून गंभीरता समोर आणली. याचवेळी सदर अपघात घडून सहा जणांचा मृत्यू झाला. या घटनेसोबतच लोकमतच्या वृत्ताचीही चर्चा होती.

Web Title: Funeral in mournful atmosphere at all

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.