शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

ठेकेदारांच्या दडपशाही विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By admin | Updated: February 7, 2015 00:35 IST

येथील जिल्हा महाऔष्णिक वीज केंद्रात ठेकेदारी पद्धतीवर काम करणाऱ्या कामगारांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर बुधवारी मोर्चा काढण्यात आला.

चंद्रपूर : येथील जिल्हा महाऔष्णिक वीज केंद्रात ठेकेदारी पद्धतीवर काम करणाऱ्या कामगारांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर बुधवारी मोर्चा काढण्यात आला. मेजरस्टोर गेटपासून निघालेल्या मोर्चात २०० पेक्षा अधिक कामगार सहभागी झाले होते. मोदी शासनाचा धिक्कार असो, महाराष्ट्र शासनाचा धिक्कार असो, किमान वेतन मिळालेच पाहिजे, केंद्र तथा राज्य सरकारचे कामगार विरोधी धोरण हाणून पाडा अशा घोषणा देत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. येथे झालेल्या सभेत सिटूचे वामन बुटले म्हणाले, थर्मल पॉवर स्टेशनमधील कामगारांसाठी महाराष्ट्र शासनानेच किमान वेतन जाहीर केले. त्यांच्या अंमलबजावणीसाठी कामगारांना रस्त्यावर यावे लागते याची लाज महाराष्ट्र शासनाला कशी काय वाटत नाही, असा सवाल त्यांनी केला. कामगार सेनेचे शंकर बागेसर यांनी देखील सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा खरपूस समाचार घेतला.रमेशचंद्र दहिवडे म्हणाले, निवडणुकीच्या वेळी त्यांना कामगार आठवतो, शेतकरी शेतमजुर आठवतो, दलित आदिवासी आठवतो, मात्र निवडून आल्यावरनंतर सर्वांना पायदळी कसे करता येईल, या दृष्टीने त्यांची पावले पडत असतात. कामगार कायद्यातील बदल भांडवलदारांच्या हितरक्षणासाठी होत आहे. हे कामगारांनी लक्षात घेतले पाहिजे. या सभेनंतर वामन बुटले यांच्या नेतृत्त्वात शिष्टमंडळ निवासी जिल्हाधिकारी कुळमेथे यांना भेटले व मागण्याचे निवेदन सादर केले. कमी केलेल्या कामगारांना तात्काळ कामावर घ्या, या प्रमुख मागणीसह अन्य चार मागण्यांचा निवेदनात समावेश होता. वामन मेश्राम यांनी आभार मानले. मोर्चाच्या यशस्वीतेसाठी पुरुषोत्तम आदे, अमोल शेंडे, अनिल वरखेडे, सुरेश देवतळे, संतोष ठाकरे, निताई घोष यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)