चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:26 IST2021-02-07T04:26:40+5:302021-02-07T04:26:40+5:30

वरोरा : दुचाकी वाहन रस्त्यावरून वळण घेत असताना मागून येणाऱ्या चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील एक ...

A four-wheeler hit a two-wheeler | चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक

चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक

वरोरा : दुचाकी वाहन रस्त्यावरून वळण घेत असताना मागून येणाऱ्या चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील एक महिला जागीच ठार तर दोघे गंभीर जखमी झाले. हा अपघात वरोरा-नागपूर मार्गावरील मजरा गावाच्या शिवारात शनिवारी सायंकाळी घडला.

राधा गंगाराम पुरानाम, कल्पना रमेश सिडाम, राजेश सिडाम हे तिघे वरोरावरून नागपूर हायवेने मजरा गावाकडे जाताना वळणावर दुचाकी वळविली. मागून येणाऱ्या चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिली. यामध्ये राधा पुरानाम जागीच ठार झाली. कल्पना सिडाम व राजेश सिडाम हे गंभीर जखमी झाले. कल्पना सिडाम यांना वरोरा येथील खासगी रुग्णालयात उपचार केल्यानंतर, प्रकृती गंभीर असल्याने चंद्रपूर येथील रुग्णालयात रेफर करण्यात आले, तर राजेश सिडाम यांच्यावर वरोरा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन्ही वाहनांचे वाहन क्रमांक मिळू शकले नाही. घटनास्थळी वरोरा पोलीस दाखल झाले असून, पुढील कारवाई सुरू आहे.

Web Title: A four-wheeler hit a two-wheeler